शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

नांदेड जिल्ह्यातील वाहनधारक हुशार ! स्वस्त पेट्रोल-डिझेलसाठी दररोज करतात सीमोल्लंघन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 5:28 PM

सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़

ठळक मुद्दे पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना  परराज्यातील पेट्रोलपंप आधारभूत ठरले आहेत़ एकीकडे पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना तेलंगणा, कर्नाटक प्रांतात मात्र तेलाचे भाव घसरत आहेत़

- श्रीधर दीक्षित /राजेश गंगमवार /गोकुळ भवरे/ लक्ष्मण तुरेराव 

नांदेड :  सीमावर्ती भागातील देगलूर, बिलोली, धर्माबाद व किनवट या तालुक्यापासून काही अंतरावर असलेल्या तेलंगणा, आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्यात पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी तफावत असल्याने वाहनधारक सीमोल्लंघन करत आहेत़  पेट्रोल दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या वाहनधारकांना  परराज्यातील पेट्रोलपंप आधारभूत ठरले आहेत़  एकीकडे पेट्रोलचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना तेलंगणा, कर्नाटक प्रांतात मात्र तेलाचे भाव घसरत आहेत़ त्यामुळे बचतीचा मार्ग स्वीकारून या तालुक्यातील वाहनधारक  हाकेच्या अंतरावर असलेल्या परप्रांतीय पंपावर जावून पेट्रोल भरताना दिसत आहेत.

तीन राज्यांच्या सीमेवर असलेल्या देगलूर तालुक्यातील पेट्रोल पंपावर तेलाचे दर वाढत असतानाच तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यातील सीमावर्ती गावातील पेट्रोल पंपावर मात्र पेट्रोल, डिझेल स्वस्त मिळत आहे़ देगलूर पासून २ कि़ मी़ अंतरावर असलेल्या तेलंगणातील मदनूर येथे पाच रूपयांनी पेट्रोल तर हानेगाव पासून १५ कि़ मी़ अंतरावर असलेल्या कर्नाटकातील औराद पंपावर  आठ रूपयांनी पेट्रोल स्वस्त आहे. देगलूर येथील पंपावर पेट्रोल ८३.२९, डिझेल ६९.३३, तेलंगणा मधील मदनूर येथे पेट्रोलचा प्रतिलिटर दर ७८.२७, डिझेलचा ७१.३३रुपये  तर कर्नाटकच्या बिदर येथे पेट्रोल ७५.८६ व डिझेल ६६.६६ रुपये असा आजचा दर आहे. प्रत्येक राज्याचा या इंधनावरील टॅक्स वेगवेगळा असल्याने तसेच पेट्रोल व डिझेल यांचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला नसल्याने दरामध्ये तफावत असल्याचे दिसते. 

बिलोलीपासून आठ कि़ मी़ अंतरावर पेट्रोल  स्वस्तशहरापासून आठ कि़मी़वर तेलंगणात असलेल्या पेट्रोलपंपावर पाच रुपयांनी पेट्रोल स्वस्त आहे़ परिणामी बिलोली शहरासह तालुक्यातील वाहनधारक त्या राज्यात पेट्रोलसाठी जात आहेत़ एकूणच दरवाढीमुळे या भागातील नागरिक चांगलेच वैतागले आहेत़ बिलोलीकरांना ८ कि़मी़ अंतर असले तरी कार्ला, येसगी, बोळेगाव, गंजगावकरांना अवघ्या ४ कि़मी़ वर पाच रुपये लिटर मागे वाचतात़ तेलंगणा भागात सध्या पेट्रोलचे दर प्रति लिटर ७८़५० पैसे आहे़ 

किनवटच्या वाहनधारकांची पसंती आदिलाबादकिनवट येथे ८३़२२ रुपये प्रतिलिटर दराने पेट्रोल विक्री होत असताना सीमावर्ती तेलंगणातील आदिलाबाद येथे मात्र पेट्रोल ७९़८५ रुपये प्रतिलिटर भावाने  मिळत आहे़ केवळ ५० ते २५ कि़मी़ अंतरावर परप्रांतात ३़३७ पैसे लिटर मागे बचत होत असल्याने वाहनधारक तेलंगणात जाऊन पेट्रोल भरण्यास पसंती देत आहेत़  मराठवाड्यात पेट्रोलचे भाव वधारले असतानाच तेलंगणात मात्र तेलाचे भाव घसरल्याचे चित्र आहे़

धर्माबादकरांची बासरच्या पंपावर गर्दी धर्माबादेत ८४़३२ रूपये प्रतिलिटर पेट्रोल मिळत आहे़ तर तेलंगणा राज्यातील अवघ्या ७ कि़ मी़ अंतरावरील बासर गावाजवळील पंपावर ७९ प्रतिलिटर पेट्रोल विक्री होत आहे़ प्रत्येक लिटर मागे ५ रूपयांची बचत होत असल्याने वाहनधारक सर्रास तेलंगणात पेट्रोल भरण्यासाठी जात आहेत़ 

इंधन दरातील तफावत
गाव पेट्रोल डीझेल 
किनवट ८३.२२६९.३८
आदिलाबाद ७९.८३७१.८१
बिलोली८३.३३७८.५०
तेलंगणा ६९.४८७२.४०
देगलूर ८३.२९६९.३३
मदनुर ७८.२७७१.३३
धर्माबाद ८४.३२७०.४१
बासर ७९.००

७४.००

 

टॅग्स :Petrolपेट्रोलPetrol Pumpपेट्रोल पंपDieselडिझेलMONEYपैसाNandedनांदेड