शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

नांदेड जिल्ह्यासाठी जलस्वराज्य अंतर्गत ५० कोटींच्या सहा पाणीपुरवठा योजना तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 18:15 IST

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत.

ठळक मुद्देमहाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत़ 

नांदेड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून जलस्वराज्य - २ कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्याला ५० कोटींचे उद्दिष्ट असून आजपर्यंत ४९़७५ कोटींच्या सहा योजना तयार असून चार योजनांना प्रशासकीय मान्यता मिळाली तर उर्वरित दोन योजनांची कामे अंतिम टप्प्यात आहेत़ 

ग्रामीण भागातील स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहेत़ यामध्ये नांदेड तालुक्यात २ योजना, बिलोली - २, उमरी- १ आणि किनवट तालुक्यात १ अशा सहा योजनांची कामे सुरू आहेत़ नांदेड तालुक्यात वाजेगाव येथे ७़७१ कोटी तर गोपाळचावडी येथे ७़७८ कोटींची योजना मंजूर झाली आहे़ या दोन्ही योजनांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून निविदेचे ईव्हालेशन प्रस्ताव मध्यवर्ती कार्यालय, मुंबईकडे पाठविण्यात आलेले आहेत़ सदर योजनेतून पाणीपुरवठ्यासाठी आमदुरा बंधारा येथून पाणीउपसा केला जाणार आहे़ तर किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे राबविण्यात येणार्‍या १८़५४ कोटींच्या योजनेसाठी लोणी धरणातून पाणीपुरवठा केला जाईल,़  त्यामुळे गोकुंदा शहरातील पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल़ 

बिलोली तालुक्यात अर्जापूर आणि सगरोळी येथील कामास प्रारंभ झाला असून या योजनांवर १२़७३ कोटी रूपये खर्च होणार आहे़ अर्जापूर येथील विहिरीचे खोदकाम करून बांधकाम पूर्ण झाले आहे़ तर सगरोळी येथील खोदकाम झाले असून बांधकाम प्रगतीपथावर आहे़ या दोन्ही योजनांतून जवळपास १५ हजार नागरिकांना पाणीपुरवठा केला जाऊ शकेल एवढी क्षमता आहे़  उमरी तालुक्यातील तळेगाव येथे २़९९ कोटींच्या योजनेस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे़ पाणीपुरवठ्यासाठी उद्भव विहीर, पंपघर, पंपिंग मशिनरी, उद्धरण वाहिनी, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था आणि किरकोळ कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

शुद्ध आणि उच्च दाबाने मिळणार पाणीच्ग्रामीण भागात स्वच्छ आणि मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे़ यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत़ राज्य शासनाच्या मुख्यमंत्री पेयजल योजना, जलस्वराज्य योजना, राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत विविध कामे केली जात आहेत़ जलस्वराज्य - २ अंतर्गत जिल्ह्यात सहा ठिकाणी कामे होत आहेत़ या योजनेतून वर्षातील ३६५ दिवसांपैकी ३०० दिवस शाश्वत पाणीपुरवठा केला जाणार आहे़ प्रत्येक दिवशी मानसी ७० लिटर पाणी मिळणार आहे़ प्रत्येक घराला मीटर बसविण्यात येणार असून १० मीटर दाबाने पाणीपुरवठ्याची तरतूद सदर योजनेत आहे़ त्यामुळे सर्वत्र समान व उच्चदाबाने पाणीपुरवठा होईल़ 

टॅग्स :Nandedनांदेडwater transportजलवाहतूकWaterपाणी