शहरं
Join us  
Trending Stories
1
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
2
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
3
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
4
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
5
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
7
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
8
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
9
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
10
Satish Shah Death: 'साराभाई वर्सेस साराभाई' फेम अभिनेते सतीश शाह यांचं निधन, ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
12
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
13
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
14
मुंबईत शिंदेसेना फक्त ६५ ते ७० जागाच लढवणार?; भाजपानं कंबर कसली, 'अबकी बार १५० पार'चा नारा
15
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास
16
कोण आहे सतीश शाह यांची पत्नी? दोघांना नव्हते मूल; जोडीदाराच्या निधनाने बसला धक्का
17
सामनावीर अन् मालिकावीर! रोहित शर्मा दुहेरी सन्मानावर म्हणाला- "मालिका हरलो असलो तरीही..."
18
Virat Kohli: 'रन मशीन' विराटची गगनभरारी! संगकाराला पछाडलं, आता फक्त सचिन तेंडुलकर पुढे
19
IND vs AUS: रोहितच्या सेंच्युरीसह किंग कोहलीची फिफ्टी; ऑस्ट्रेलिया विरुद्ध अखेरच्या वनडेत अविस्मरणीय शो!
20
मंगळ गोचर २०२५: २७ ऑक्टोबर रोजी मंगळ गोचर; पुढचे दोन महिने 'या' ५ राशींसाठी असणार खास!

नांदेड जिल्ह्यात अपघातांचे दुष्टचक्र थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 00:26 IST

गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.

ठळक मुद्देदीड वर्षांत ९७२ अपघात : ३९१ जणांना गमवावा लागला जीव; ५९७ गंभीर

गोविंद सरदेशपांडे।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध भागात ९७२ अपघातांच्या घडल्या असून यामध्ये तब्बल ३९१ जणांनी जीव गमावला आहे. तर ५९७ गंभीर व २१६ जण किरकोळ जखमी झाली आहेत.देशासह राज्यात घडणाऱ्या अपघातांच्या घटनांच्या संख्येत घट व्हावी, यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. परंतु, अनेकवेळा रस्त्यांवरील वाहनांचा वेग यासह वाहनचालकांनी केलेल्या चुकांमुळे हे अपघात घडत असल्याची माहिती आहे.दरम्यान, जानेवारी २०१७ ते मार्च १८ या दीड वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात अपघाताच्या एकूण ९७२ घडल्या असून यामध्ये एकूण ३९१ जण दगावले आहेत. अपघात होण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात जानेवारी २०१७ मध्ये ५५ अपघात झाले. यामध्ये २५ जण दगावले. तर फेबु्रवारीमध्ये ४९ अपघातात २०, मार्चमध्ये ७२ अपघात झाले. ज्यामध्ये ३४ जणांचा मृत्यू झाला. तसेच एप्रिल महिन्यातील ६५ अपघातांत ३०, मे महिन्यात ७५ अपघातांच्या घटनांत ३८, जून महिन्यात ७४ अपघात झाले. यात २७ जण दगावले. जुलै महिन्यात ७२ अपघात झाले. त्यात २० जण दगावले. तसेच आॅगस्ट महिन्यात ७१ अपघात झाले असून यामध्ये ३७ जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर महिन्यात ६० अपघातांत २२ तर आॅक्टोबर महिन्यात २३ जण दगावले. नोव्हेंबर महिन्यात ६४ अपघातांत ३०, डिसेंबर महिन्यात ६७ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाला. तर सन २०१८ मधील जानेवारी महिन्यातील ६४ अपघातांत २३, फेबु्रवारीमध्ये ५८ अपघातांत २१ तर मार्च महिन्यात झालेल्या ६६ अपघातांमध्ये २९ जण दगावले तर ५९७ जण गंभीर जखमी झाले आहेत. जिल्ह्यात ४९ ब्लॅक स्पॉट आहेत़ या सर्व ब्लॅक स्पॉटवर सुरक्षेच्या दृष्टीने पट्टे ओढणे, फलक लावणे यासारख्या उपाययोजना करणे आवश्यक असते़ परंतु त्याकडे सर्रासपणे दुर्लक्ष करण्यात येते़अपघातांच्या घटनांमध्ये घट व्हावी, यासाठी नागरिकांमध्ये आणखी जास्त जनजागृती होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहने चालविल्यास निश्चितच अपघाताच्या घटनांत घट होण्यास मदत मिळणार आहे.दुचाकीस्वारांनी अशी काळजी घ्यावीदुचाकीवर दोनपेक्षा जास्त व्यक्तीने प्रवास करू नये, नेहमी हेल्मेटचा वापर करावा, दुचाकी चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, ओव्हरटेक करताना नेहमी उजव्या बाजूनेच करावे, लहान मुलांना वाहनाच्या टाकीवर बसवू नका, वाहनाची कागदपत्रे नेहमी सोबत बाळगा, वाहन धोकादायक पद्धतीने किंवा वेडेवाकडे चालवून पुढे घुसण्याचा प्रयत्न करू नका, दुचाकीची वेग मर्यादा ताशी ५० किमी. असून त्याचे पालन करा.जड वाहनांसाठीचे नियमचालक व वाहनात बसणाºया इतर व्यक्तींनी सीट बेल्टचा वापर करावा, वाहनात माल भरताना योग्य बांधणी करावी, मालाच्या आकाराप्रमाणे वाहनाची निवड करावी, प्रखर किंवा रंगीत दिव्यांचा वापर करू नका, तसेच डिप्परचा वापर करा, रस्त्यावरील आखलेल्या पट्ट्यांचा अर्थ जाणून घ्या व त्याप्रमाणे त्याचे पालन करा, आवश्यकता असेल तरच हॉर्नचा उपयोग करा, अपघातग्रस्तांना त्वरित मदत करा, टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवावा, इंधनाची व वंगणाची पातळी तपासावी़रस्ता सुरक्षा समित्या नावालाचरस्ता सुरक्षेसाठी राज्य परिवहन महामंडळ, पोलिस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाºयांचा समावेश असलेली रस्ता सुरक्षा समिती असते़ या समितीकडून नियमितपणे अपघात प्रवण स्थळे, कारवाई याचा आढावा घेण्यात येतो़ परंतु वाढत्या अपघातांच्या घटनांबद्दल समितीकडून कुठल्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत़ त्यामुळे सध्या तरी ही समिती नावालाच आहे़

टॅग्स :NandedनांदेडAccidentअपघातDeathमृत्यू