शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड जिल्ह्यात दहा लाख घनमीटर गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:50 IST

जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.

ठळक मुद्देगाळमुक्त धरण : ३२ तलावांतून उपसला गाळ

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या योजनेला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून मार्चपासून सुरू झालेल्या या कामामध्ये राज्यात सर्वाधिक १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ जिल्ह्यातील ३२ तलावांतून उपसण्यात आला आहे. जवळपास दीड लाख ट्रॅक्टर गाळ शेतक-यांनी आपल्या शेतात नेला आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत ४६ तलावांतील गाळ काढण्याच्या कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यापैकी आजघडीला ३२ तलावांतून गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जवळपास ५० हून अधिक पोकलेन व जेसीबी मशीनद्वारे गाळ काढण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३२ तलावांतून १० लाख ४८ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे.गाळ काढण्याचे हे काम संपूर्ण लोकसहभाग आणि प्रशासकीय पातळीवर अशा दोन टप्प्यांत सुरू आहे. संपूर्ण लोकसहभागाअंतर्गत सुरू असलेल्या कामामध्ये प्रशासनाकडून तांत्रिक मार्गदर्शन केले जात आहे.यासाठी मानव लोक सेवाभावी संस्था, अनुलोम सेवाभावी संस्था आणि सगरोळी सांस्कृतिक मंडळ सगरोळीचे येथील संस्थांचे सहाय मिळत आहे. तर प्रशासकीय पातळीवरील कामामध्ये तांत्रिक मार्गदर्शनासह ११.५७ पैसे प्रति घनमीटर दराने जेसीबींना भाडे दिले जात आहे. जिल्ह्यात झालेल्या गाळमुक्त धरण योजनेत राज्यात सर्वाधिक गाळ नांदेड जिल्ह्यातून काढल्याची माहितीही जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.जिल्ह्यात गाळमुक्त धरण योजनेअंतर्गत निघणारा गाळ घेवून जाण्यासाठी शेतकºयांनी तितकाच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. त्यातून गाळयुक्त शिवार ही संकल्पनाही प्रत्यक्षात येत आहे. गाळ नेलेल्या अनेक शेतकºयांनी आपल्या शेतातून पिकांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले आहे.तलावातील गाळ काढण्यास चांगला प्रतिसाद मिळत असला तरीही त्यासाठी आवश्यक ती मशिनरी उपलब्ध नसल्याने या कामाला म्हणावी तितकी गती आली नसल्याची बाबही पुढे आली आहे. गाळमुक्त धरणासाठी शासनस्तरावर निधीची कमतरता नसली तरीही तांत्रिक साहित्य उपलब्ध होत नाही. या कामासाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्याचवेळी शिर्डी संस्थान आणि सिद्धीविनायक ट्रस्टकडेही मदत मागण्यात आल्याचे डोंगरे यांनी सांगितले.मानार धरणातून पहिल्यांदाच गाळ उपसाजिल्ह्यात सर्वात मोठे धरण असलेल्या मानार प्रकल्पातील गाळ उपसा करण्याचे कामही सुरू झाले आहे. या धरणाच्या निर्मितीपासून म्हणजेच १९६२ पासून पहिल्यांदाच या धरणातील गाळ काढला जात आहे. मानार धरणात जवळपास २५ लाख घनमीटर गाळ असल्याचा अंदाज सिंचन विभागाने व्यक्त केला आहे. या धरणातून गाळ काढल्यानंतर पाणी उपलब्धता वाढणार आहे. विष्णूपुरी प्रकल्पातील गाळ उपसा करण्याबाबत नियोजन केले जात आहे. मात्र विष्णूपुरीत नांदेड शहरासाठी पाण्याचा साठा आहे. त्यामुळे याबाबत मे अखेरीस हालचाली होतील़ विष्णूपुरी प्रकल्पाच्या दरवाजा क्र. १८ च्या दुरुस्तीबाबतही प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :DamधरणFarmerशेतकरी