शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीचे ६९३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 15:52 IST

राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़

ठळक मुद्दे आता नव्याने अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली एकट्या बँक आॅफ इंडियाच्या ७० हजार २०९ नऊ शेतकऱ्यांच्या खात्यातील तब्बल ४७४ कोटी ४२ लाख रुपये माफ केले आहेत़

नांदेड : राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ६९३ कोटी ९७ लाख रुपये जमा करण्यात आले आहेत़ त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह इतरही खाजगी बँकांचा समावेश आहे़ आता नव्याने अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ आतापर्यंत एकट्या बँक आॅफ इंडियाच्या ७० हजार २०९ नऊ शेतकऱ्यांच्या खात्यातील तब्बल ४७४ कोटी ४२ लाख रुपये माफ केले आहेत़

आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी योजना असल्याचा राज्य शासनाने प्रचार केला़ परंतु सुरुवातीच्या टप्प्यात कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज भरतानाच शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला आला होता़ त्यात कोणत्याही एकाच खात्यातील रक्कम माफ होणार असल्याच्या निर्णयानंतर अगोदर फुगलेली शेतकऱ्यांची संख्या पडताळणीत कमी झाली़ 

त्यानंतरही कागदपत्रांची जमवाजमव करताना शेतकऱ्यांना बँकाचे उंबरठे झिजवावे लागले़ त्यात आता शासनाने दीड लाखांवरील कर्जाची रक्कम भरण्यासाठी सेटलमेंट योजना आणली़ त्यासाठी अगोदरच ३१ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती़ परंतु सेटलमेंटला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळे त्याची मुदत आता ३० एप्रिलपर्यंत करण्यात आली आहे़ तर कर्जमाफीसाठी नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठीही मुदतवाढ देण्यात आली आहे़ तर दुसरीकडे आतापर्यंत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांच्या ग्रीन लिस्ट येणेही सुरुच आहे़ त्यामुळे कर्जमाफीचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे़ 

बँकनिहाय मिळालेली कर्जमाफी- जिल्हा मध्यवर्ती बँक-३७ हजार १७५ शेतकरी - ४९ कोटी ७७ लाख रुपये, महाराष्ट्र ग्रामीण बँक- १८ हजार ४५२ शेतकरी -१०८ कोटी ५६ लाख रुपये, अलाहाबाद बँक-१६०-७८ लाख, आंध्रा बँक-२६-२० लाख, बँक आॅफ बडोदा-१४१-५६ लाख, बँक आॅफ इंडिया-३००-१ कोटी १ लाख, बँक आॅफ महाराष्ट्र-६ हजार २३१-२९ कोटी ७६ लाख, कॅनरा बँक-३४८- १ कोटी ८० लाख, सेंट्रल बँक आॅफ इंडिया-२०-१४ कोटी ७६ लाख, कॉर्पोरेशन बँक-४१, २७ लाख, देना बँक-११६८-७ कोटी ७९ लाख, इंडियन ओवरसीज बँक-५-५ लाख, ओबीसी बँक-३२-१९ लाख, पंजाब अ‍ॅन्ड सिंध बँक-३८-२५ लाख, पंजाब नॅशनल बँक-४३-१८ बँक, सिंडीकेट बँक-१३-१२ लाख, आयसीआयसीआय बँक-३-३ लाख, युनियन बँक आॅफ इंडिया-३११-२ कोटी ११ लाख, एक्सीस बँक-६-५ लाख, एचडीएफसी बँक-२७२- १ कोटी २९ लाख, डेव्हलपमेंट क्रेडीट बँक-४- २ लाख रुपये या बँकातील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरले़ तर आयडीबीआय, विजया, कर्नाटका, युको, कोटक महिंद्रा व करुर वैश्य या बँकांना मात्र कर्जमाफीचे कोणतेही उद्दिष्ट नसल्याचे आढळून आले़ 

तीन महिन्यांत २५ आत्महत्याकर्जमाफी योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटना कमी होतील, असा अंदाज बांधण्यात येत होता़ परंतु तो साफ चुकीचा ठरला़ गेल्या तीन महिन्यांत जिल्ह्यात २५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे़ त्यामध्ये १७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या अनुदानासाठी पात्र ठरल्या आहेत़ तर ८ आत्महत्या अपात्र ठरविण्यात आल्या आहेत़ गेल्या पाच वर्षांत जिल्ह्यात तब्बल ७५१ शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे़ 

मुदतवाढीचा लाभ घ्यावाकर्जमाफीच्या योजनेसाठी नवीन शेतकऱ्यांना अर्ज करण्यासाठी १४ एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे़ तर सेटलमेंटसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत वाढविण्यात आली आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील  शेतकऱ्यांनी या मुदतवाढीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांनी केले आहे़ 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारgovernment schemeसरकारी योजनाbankबँकMONEYपैसा