शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूक; भाजपकडून शिवसेनेच्या साबणेंना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2021 14:14 IST

देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.

नांदेड: देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साबणे भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा असतांना, त्यांच्या प्रवेशापूर्वीच त्यांना उमेदवारी जाहीर करून भाजपने इच्छुकांना धक्का दिला आहे. (Nanded : Deglaur-Biloli Assembly by-election; BJP nominates Subhash Sabne )

देगलूर-बिलोली विधानसभा मतदार संघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने ही जागेसाठी ३० ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्यात आणि सुभाष साबणे यांच्यामध्ये काही वेळ चर्चा झाली. 

तीन वेळा आमदार राहिले आहेत साबणे - भाजपकडून देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. साबणे हे यापूर्वी तीन वेळा आमदार राहिलेले आहेत. मुखेड विधानसभा मतदार संघातून दोन वेळा तर देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात एकवेळ त्यांचा विजय झाला आहे. २००९ च्या निवडणुकीमध्ये सुभाष साबणे यांचा पराभव करून रावसाहेब अंतापूरकर हे विजयी झाले होते. त्यानंतर २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सुभाष साबणे यांनी रावसाहेब अंतापुरकर यांचा पराभव केला होता. दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा अंतापूरकर यांनी साबणेंचा पराभव केला. दुर्दैवाने रावसाहेब अंतापुरकर यांचे आकस्मिक निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणुक होत आहे.  

पुन्हा अंतापूरकरविरूद्ध-साबणे!आजघडीला राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने  देगलूर बिलोली विधानसभेची जागा काँग्रेसला गेल्याने नाराज साबणे यांनी भाजपची वाट धरली.  या पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून दिवंगत रावसाहेब अंतापूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांच्यासह सहा जणांनी उमेदवारी मागितली आहे. परंतु, यासंदर्भात अंतिम निर्णय दिल्लीत होणार असल्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मात्र, काँग्रेसची उमेदवारी जीतेश अंतापूरकर यांनाच मिळेल, असे मानले जात आहे. तसे झाले तर पुन्हा अंतापूरकर विरुद्ध सुभाष साबणे अशी लढत होईल. त्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार कोण? इतर पक्षाची भूमिकाही महत्वपूर्ण ठरणार आहे.  

टॅग्स :BJPभाजपाNandedनांदेडShiv Senaशिवसेना