शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: अर्धापुरात कारचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, बाळासह चौघांची मृत्यूशी झुंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:42 IST

अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत

गोविंद टेकाळेअर्धापूर (नांदेड): नांदेड-हदगाव मार्गावर आज सकाळी ९ वाजता एका कारचा भीषण अपघात झाला आहे. अर्धापूर शहराजवळील एका मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगातील कार (MH-26 AK 4956) अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली. या भीषण धडकेत विजय खंदारे (वय ४५, रा. साप्ती) यांचा जागीच मृत्यू झाला असून, एका अडीच महिन्यांच्या चिमुकल्यासह अन्य चौघे जण मृत्यूशी झुंज देत आहेत.

कार नांदेडकडून हदगावकडे जात असताना हा अपघात झाला. धडक इतकी जोरात होती की कारचा चक्काचूर झाला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्रभारी विजय पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. नरेंद्राचार्य संस्थान आणि १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना तातडीने बाहेर काढण्यात आले. जखमींमध्ये ऋतुजा कांबळे (२४), आरोही पंडित (१०), आदर्श खंदारे (२२) आणि एका अडीच महिन्यांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दुसरा अपघात टाळण्यासाठी नागरिकांची तत्परताअपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ऑइल सांडले होते. त्यामुळे इतर गाड्या घसरून अपघात होऊ नये म्हणून स्थानिक नागरिकांनी त्यावर तातडीने माती टाकून रस्ता साफ केला. जरार आहमद, सलिम माणिकपेठे यांच्यासह अनेक तरुणांनी यावेळी माणुसकीचे दर्शन घडवत मदतकार्य केले. हा अपघात नेमका टायर फुटल्याने झाला की चालकाचे नियंत्रण सुटल्याने, याचा तपास पोलीस करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Nanded: Car crash in Ardhapur kills one, injures four.

Web Summary : A car accident on the Nanded-Hadgaon road near Ardhapur resulted in one death and four injuries, including a baby. The car crashed into a divider. Locals assisted, clearing oil to prevent further accidents. Police investigate the cause.
टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड