- गोविंद टेकाळेअर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील निमगाव येथील दोन चिमुकली मुले खेळतांना कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. यात भावाचा मुलगा तर दिवाळीला आलेल्या बहिणीची मुलगी या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील रामा मोहन राठोड यांच्या मुलाचा मुलगा स्वस्तिक सचिन राठोड वय अडीच वर्षे रा . निमगाव ता.अर्धापूर व दिवाळीसाठी आलेली मुलीची मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण वय २ वर्षे रा. बेलखेड ता. उमरखेड दोन्ही चिमुकली बालके खेळत खेळत घराच्या बाजूला असलेल्या एका कालव्यात बुडाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु, मुले कुठेच सापडली नाहीत. काही वेळाने बाजुला असलेल्या इसापुरच्या कॅनॉलमध्ये दोघेही आढळून आले, हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ निमगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,पोउनी सुरेश भोसले यांनी भेट दिली.
ही दुर्दैवी घटना समजताच माजी आमदार माधवराव जवळगावकर, सभापती संजयराव लहानकर, सभापती गंगाधरराव चाभरेकर, आनंदराव भंडारे, नागोराव भांगे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटना प्रकरणी पोलीसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
Web Summary : Two young children, a nephew and niece visiting for Diwali, tragically drowned in a canal in Nimgaon, Nanded district. The children, aged two and two and a half, were playing near the canal when the accident occurred. Their bodies were recovered from the canal and were declared dead at a local hospital. The incident has cast a pall of gloom over the village.
Web Summary : नांदेड़ जिले के निमगांव में दिवाली पर घूमने आए एक भतीजे और भतीजी की नहर में डूबने से दर्दनाक मौत हो गई। दो और ढाई साल के बच्चे नहर के पास खेल रहे थे तभी यह हादसा हुआ। उनके शव नहर से बरामद किए गए और एक स्थानीय अस्पताल में उन्हें मृत घोषित कर दिया गया। इस घटना से गांव में मातम छा गया है।