शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Nanded: उन्हाच्या तडाख्यात मोठ्या कष्टाने जगवलेल्या केळीच्या बागा वादळीवाऱ्याने उद्धवस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 18:18 IST

अर्धापूरात वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उद्धवस्त; शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला

- गोविंद टेकाळे अर्धापूर (जिल्हा नांदेड) : गेल्या काही दिवसापासून तापमानात वाढ झाली आहे. वाढत्या तापमानाचा केळी बागांना मोठा फटका बसत असून पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून बाग जोपासत असतानाच सोमवारी दि.५ रोजी सायंकाळी जोरदार वादळी वादळीवाऱ्यामुळे केळी बागा उन्मळून, मोडून पडल्या आहेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाले. 

काही दिवसापासून तापमानाचा पारा ४५ अंशावर गेल्याने वाढत्या तापमानात केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात होरपळल्या. पाणी पातळी खालावल्याने पाण्याचे कसेबसे नियोजन करून केळीच्या बागा शेतकऱ्यांनी जगवल्या. काढणी आलेली असतानाच आता वादळीवाऱ्याने केळीच्या बागा आडव्या पडल्या आहेत. यात शेतकऱ्यांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. बामणी येथील बालाजी सत्ताप्पा हुडे गट नं.३०, उमाजी शंकर देलमडे ग. नं.७७, संजय नागोराव देलमोडे गट २७, माणिक मारोती हुडे गट नंबर २४, बंडू बाबुराव देलमडे गट नंबर २६ यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.

हातातोंडाशी आलेला घास हिरावलानांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे केळीचे मोठे नुकसान झाले आहे. बामणी शिवारात केळीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जोराच्या वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा आडव्या पडल्या असून अक्षरशः केळीच्या पानांची चाळणी झाली आहे. शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सायंकाळी झालेल्या  वादळी वाऱ्याने या शिवारातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. केळीचे भाव कोसळल्यामुळे उत्पादक शेतकरी निराश झाले आहेत. या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्याने झाडे उन्मळून पडल्या आहेत. हाती आलेल्या पिकांचे डोळ्यांसमोर नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदील झाले आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र