शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Nanded Attack on Police: तलवार, भाल्याने पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी ३०० जणांवर गुन्हा दाखल; १८ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 15:22 IST

Nanded Attack on Police: या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे.

ठळक मुद्देतरुणांच्या या जत्थ्याने एक क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोरील बॅरीकेटींग तोडून मुख्य रस्त्यावर धाव घेतली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला चढविला. यामध्ये पोलिस उपाधीक्षकासह इतर सात कर्मचारी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे

नांदेड :  येथील श्री सचखंड गुरुद्वाराच्या वतीने दरवर्षी धुळवडीच्या दिवशी पारंपारिक पद्धतीने हातात उघडी शस्त्रे प्रतिकात्मक हल्ला बोल मिरवणुक काढण्यात येते. परंतु यंदा लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मिरवणुकीसाठी परवानगी नाकारली होती. सोमवारी सायंकाळी चार वाजता गुरुद्वारात आरती झाल्यानंतर मात्र तरुण भाविकांचे जत्थे हातात उघड्या तलवारी घेवून मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर घेवून आले. यावेळी पोलिसांनी अटकाव करताच त्यांच्यावर भाला आणि तलवारीने हल्ला करण्यात आला. यामध्ये आठ पोलिस कर्मचारी जखमी झाले असून पोलिसांच्या आठ वाहनांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे. तर १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पाेलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांनी दिली.

याबाबत मंगळवारी पाेलिस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे पत्रपरिषदेत म्हणाले, लॉकडाऊन असल्यामुळे यंदा मिरवणुकीला परवानगी नाकारली होती. मिरवणुक काढू नये म्हणून जिल्हाधिकारी विपीन ईटणकर आणि मी गुरुद्वाराची प्रशासकीय समिती व संत बाबा कुलवंतसिंगजी, संत बाबा बलविंदरसिंगजी यांच्याशी चर्चा केली हाेती. सर्वांनी त्यावेळी मिरवणुक काढणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच समाजाला आवाहनही केले होते. परंतु २९ मार्च धुळवडीच्या दिवशी सायंकाळी चार वाजता अरदास झाल्यानंतर गुरुद्वाराच्या आत हल्ला बोल मिरवणुक काढण्यात आली. यावेळी काही उत्साही तरुणांनी ही मिरवणुक गुरुद्वाराच्या बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी धर्मगुरुंनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणीच ऐकून घेण्याच्या तयारीत नव्हते. 

तरुणांच्या या जत्थ्याने एक क्रमांकाच्या प्रवेशद्वारासमोरील बॅरीकेटींग तोडून मुख्य रस्त्यावर धाव घेतली. यावेळी बंदोबस्तावरील पोलिसांवर तलवार आणि भाल्याने हल्ला चढविला. यामध्ये पोलिस उपाधीक्षकासह इतर सात कर्मचारी जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. तर पोलिस अधीक्षक, उपधीक्षक, पोलिस निरिक्षक यासह इतर आठ वाहनांचे प्रचंड नुकसान करण्यात आले आहे. या प्रकरणात ३०० जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून ६० जणांची सीसीटिव्ही फुटेजवरुन ओळख पटविण्यात आहे. तर १८ जणांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याचेही शेवाळे म्हणाले.

पोलिसांना होती पूर्वसुचनामागील वर्षी लॉकडाऊन असताना न्यायालयाच्या परवानगीने दसऱ्यानिमित्त गुरुद्वारातून मिरवणुक काढण्यात आली होती. परंतु त्यावेळी मोठा गोंधळ उडाला होता. मिरवणुकीत मास्क वापरण्यात आले नव्हते. तसेच सोशल डिस्टसिंगचा फज्जा उडाला होता. तसेच पोलिसांसोबत धक्काबुक्कीचा प्रकारही घडला होता. यावेळीही तसाच काहीसा प्रकार होणार याची पूर्वसुचना होती. अशी कबुली पोलिस अधीक्षक शेवाळे यांनी दिली.

आरोपींची गय केली जाणार नाहीगुरुद्वारा येथील धर्मगुरुंनी मिरवणुक निघणार नाही अशी प्रशासनाला ग्वाही दिली होती. परंतु काही जणांनी तो शब्द पाळला नाही. त्यामुळे या घटनेला केवळ प्रशासनाला जबाबदार धरुन चालणार नाही. घटनेतील आरोपींची गय केली जाणार नाही अशी प्रतिक्रिया पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली.

पोलिसांना नीट काम करु दिले जात नाहीनांदेडमध्ये पोलिसांना नीट काम करु दिले जात नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या विकृती फोफावल्या आहेत. अशी टिका खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी केली. तसेच धुळवडीच्या दिवशीच गुरुद्वाराचे सचिव मुंबईला कसे गेले होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :NandedनांदेडPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी