शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नांदेडात अनुदान याद्यांचा घोळ मिटेना; शेतकऱ्यांसाठीचे २६३ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 19:03 IST

शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  

ठळक मुद्दे पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब , बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये पडून आहेत.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  दरम्यान, पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे़ परंतु, बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आली आहे़ त्यातच शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनंतरही पिकांचा योग्य मोबदला मिळत आहे़ परंतु, हजारो शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे़ त्यातच २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पीक गेले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतल्याने हतबल झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे कवच मिळाले़ तर पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी २६१ कोटी ९६ लाख रुपये दिले़

यातून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणात आहे़ तर मागील वर्षात भोकर, किनवट, माहूर, मुदखेड आणि नायगाव या पाच तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा फटका बसला़ त्यांना मदत म्हणून शासनाने ८५ लाख रूपये मंजूर करून ते जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा केले़ परंतु, आजपर्यंत दोन्ही वर्षातील अनुदान वाटपास प्रत्यक्षात सुरूवात झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यातून रोष व्यक्त केला जात आहे़ दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला असेल त्यांना हे अनुदान देता येणार नाही़ त्यामुळे पीकविमा प्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून मिळविण्याचे काम संबंधित तहसील प्रशासन करीत असल्याचे समजते़ त्यातही वेगवेगळ्या बँकांना वेगवेगळी गावे दत्तक दिली आहेत़ पीकविमा वेगळ्या बॅकेत मिळाला तर गाव दत्तक वेगळ्याच बँकेत आहे़ त्यातच सरकारने छत्रपती शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली़ या निर्णयाची अंमलबजावणीत बँका गुंतल्याने पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या याद्या काढण्यात वेळ गेला़

मागील दोन वर्षांपासून सदर याद्यांचा घोळ मिटलेला नाही़ परिणामी शेतकऱ्यांचे २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत़  यात २६१ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपये हे २०१६ मधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तर ८५ लाख रूपये हे २०१७ मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पाच तालुक्यांसाठी आहेत़ नांदेड जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये बहुतांश मंडळात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले़ त्यातच सलग रिमझिम पाऊस, दमट वातावरणामुळे सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला़ 

अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटेअतिवृष्टीने नुकसान झालेल्या, परंतु विम्यापासून वंचित  शेतकऱ्यांची नावे बँकेकडून घेण्याचे तसेच काही ठिकाणी अनुदान वाटपाचे काम सुरू आहे़ वंचित शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी सांगितले़ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मिळालेली तालुकानिहाय रक्कम (कोटीमध्ये) नांदेड-१३़३४, मुदखेड-१९़५३, अर्धापूर- ११़४५ भोकर-७़४४, कंधार-१७़६३, लोहा-२९़४२, किनवट-२०़८३, माहूर-१३़०१, हदगाव -१५़१४, हिमायतनगर-८़५७, देगलूर- १९़९६,  मुखेड-३१़११  नायगाव -१३़२१, उमरी - ११़७६, धर्माबाद -११़८१ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़  

टॅग्स :fundsनिधीNandedनांदेडFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारagricultureशेती