नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा. पं.मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:10 IST2020-12-28T04:10:17+5:302020-12-28T04:10:17+5:30

नायगाव बाजार : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आठ ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. नायगाव तालुक्यात ...

In Naigaon taluka election, 8 g. There are more women voters than men in Pt | नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा. पं.मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

नायगाव तालुका निवडणुकीत ८ ग्रा. पं.मध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक

नायगाव बाजार : तालुक्यात होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आठ ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.

नायगाव तालुक्यात ६८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्यात येत असून, सध्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे काम सुरू आहे. या ६८ ग्रामपंचायतींची एकूण मतदारसंख्या ११०५६२ आहे. मतदारसंख्येनुसार मतदारांना मतदान करण्यासाठी २२५ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यात सर्वात मोठा नरसी, तर सर्वात लहान मेळगाव ग्रामपंचायत मतदारसंघ आहे.

या निवडणुकीत भोपाळा, धुप्पा, खैरगाव, कुंचोली, मुस्तापूर शेळगाव गौरी, टाकळी (बु.), मनूर (त.ब) या ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. भोपाळा ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुष ५०८ व महिला ५७१, तर एकूण १०७९ मतदार आहेत. धुप्पामध्ये पुरुष ६४८ व महिला ६९२, तर एकूण १३४०,

खैरगावात पुरुष ६८२ महिला ६८५, एकूण १३६७ मतदार आहेत. कुंचोली येथे पुरुष ९०१ व महिला १ हजार, तर एकूण १९१० मतदार आहेत. मुस्तापूर येथे पुरुष ३१० व महिला ३१९, एकूण ६२९ मतदार आहेत. शेळगाव गौरीमध्ये पुरुष ६१६, महिला ६८७, एकूण १३०३ मतदार आहेत. टाकळी(बु.) पुरुष ६९६, महिला ८००, एकूण १४९५ मतदार आहेत. मनूर (त.ब) पुरुष ५४१, महिला ५४७, एकूण १०८८ मतदार आहेत. या ८ ग्रामपंचायत मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या ३९१ ने अधिक आहे.

Web Title: In Naigaon taluka election, 8 g. There are more women voters than men in Pt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.