थकीत करापोटी मनपा पथकाकडून कारवाई सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:32 IST2021-03-13T04:32:41+5:302021-03-13T04:32:41+5:30

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्य निर्धारक व करसंकलन अजितपाल संधू यांच्या आदेशानुसार दोन ...

Municipal Corporation continues to take action due to exhausted taxes | थकीत करापोटी मनपा पथकाकडून कारवाई सुरूच

थकीत करापोटी मनपा पथकाकडून कारवाई सुरूच

नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली मूल्य निर्धारक व करसंकलन अजितपाल संधू यांच्या आदेशानुसार दोन क्र. ६ कार्यालय अंतर्गत सहायक आयुक्त रावण सोनसळे यांच्या पथकाने शुक्रवारी मालमत्ता कर वसुलीपोटी कारवाई केली. या माेहिमेंतर्गत शुक्रवारी ४ लाख ७१ हजार रुपयांची वसुली करण्यात आली. तर एका मालमत्ताधारकाकडून करापोटी १ लाख १९ हजार ९२२ रुपये येणे बाकी असल्याने संबंधिताने तसेच त्याने कर भरण्यास नकार दिल्यामुळे संबंधितांचा भूखंड जप्त करण्यात आला. तर तीन मालमत्ताधारकाकडून कर येणे बाकी असल्याने त्याचे पाणी पुरवठा खंडित करून नळ कनेक्शन बंद करण्यात आले. कर निरीक्षक सुधीरसिंह बैस, व्यंकट गायकवाड, मारोती सारंग, सुदाम थोरात आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Municipal Corporation continues to take action due to exhausted taxes