बिलोलीत १० आरओ व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:20+5:302020-12-27T04:13:20+5:30

गत आठवड्यात नगर परिषदेकडून शहरातील सर्व आरओ व्यावसायिकांना अधिकृत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती; परंतु थंड पाण्याचा ...

Municipal administration takes action against 10 RO professionals in Biloli | बिलोलीत १० आरओ व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाची कारवाई

बिलोलीत १० आरओ व्यावसायिकांवर पालिका प्रशासनाची कारवाई

गत आठवड्यात नगर परिषदेकडून शहरातील सर्व आरओ व्यावसायिकांना अधिकृत प्रमाणपत्र सादर करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली होती; परंतु थंड पाण्याचा गोरख धंदा गरम करू पाहणाऱ्या अनधिकृत व्यावसायिकांनी तसे प्रमाणपत्र सादर केले नसल्याने बेकायदेशीर सुरू असलेल्या आरओ प्लांटला नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी ताळे ठोकले आहे. सदरची कार्यवाही मुख्याधिकारी गंगाधर पेंटे यांच्या आदेशावरून अभियंता माधव पाटील, विनायक जाधव, उत्तम पोवाडे, प्रदीप ढिलोड, जगन्नाथ मेघमाळे, भीम कुडके, निर्मळे आदी कर्मचाऱ्यांनी केली आहे. यावेळी नगरसेवक प्रतिनिधी गंगाधर पोप्पुलवार यांनी सहकार्य केले आहे.

कोट

सर्वत्र बाटलीबंद व्यवसाय जोमात सुरू असल्याच्या तक्रारी नागरिकांनी राज्य शासनाकडे अनेकदा केल्या होत्या. त्याची दखल घेऊन अनधिकृत सुरू असलेले आरओ प्लांट बंद करण्याचे आदेश काढण्यात आले आहे.

- गंगाधर पेंटे, मुख्याधिकारी न. प. बिलोली.

Web Title: Municipal administration takes action against 10 RO professionals in Biloli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.