पुण्याच्या ‘शिवशाही’ प्रवासाला अखेर मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 00:17 IST2018-02-17T00:17:52+5:302018-02-17T00:17:59+5:30

दीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड-पुणे-नांदेड या मार्गासाठी नांदेड विभागाला चार शिवशाही गाड्या मिळाल्या आहेत़ शनिवारी रात्री ८ वाजता पुण्यासाठी पहिली शिवशाही बस धावेल़ पुणे ‘शिवशाही’ला मुहूर्त मिळेना या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़

Muhurat finally completes his journey on Shiva Shahi | पुण्याच्या ‘शिवशाही’ प्रवासाला अखेर मुहूर्त

पुण्याच्या ‘शिवशाही’ प्रवासाला अखेर मुहूर्त

ठळक मुद्देलोकमत इफेक्ट : दुस-या टप्प्यात मिळाल्या चार गाड्या

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : दीर्घ प्रतीक्षेनंतर नांदेड-पुणे-नांदेड या मार्गासाठी नांदेड विभागाला चार शिवशाही गाड्या मिळाल्या आहेत़ शनिवारी रात्री ८ वाजता पुण्यासाठी पहिली शिवशाही बस धावेल़ पुणे ‘शिवशाही’ला मुहूर्त मिळेना या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते़
नांदेड जिल्ह्यात २२ जानेवारी २०१८ रोजी मुहूर्त मिळाला़ पहिल्या टप्प्यात आलेल्या सहा बस नांदेड-हैदराबाद मार्गावर सोडण्यात आल्या होत्या़ पुण्यासाठी मागणी असूनदेखील बस न सोडल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती़ यासंदर्भातील पाठपुरावा आणि खाजगी कंपन्यांशी असलेल्या ‘अर्थपूर्ण’ संबंधामुळे पुणे मार्गावर शिवशाही सोडली जात नसल्याचा होणारा आरोप लक्षात घेता नांदेड- पुणे- नांदेड शिवशाही बससेवा सुरू करण्यात आली आहे़ नांदेड ते पुणे प्रवासासाठी ७५० रूपये तिकीट असून खाजगी कंपन्यांच्या गाड्यांच्या तुलनेत तिकीट अधिक असल्याने दर कमी करण्याची मागणी काही प्रवाशांनी केली आहे़ शनिवारी रात्री आठ वाजता नांदेड येथून पुण्यासाठी पहिली शिवशाही गाडी धावणार आहे़ सदर गाडी लोहा, गंगाखेड, परळी, अंबाजोगाई, पाटोदा, अहमदनगर, शिवाजीनगरमार्गे पिंपरी चिंचवड येथे सकाळी ६़१५ वाजता पोहोचेल़ तर परतीच्या प्रवासासाठी त्याचमार्गे सदर गाडी पिंपरी चिंचवड येथून रात्री आठ वाजता निघेल़

पुण्यासाठी आॅनलाईन बुकिंग उपलब्ध- नेहूल
पुणे शिवशाही गाड्यांची आॅनलाईन, ओआरएसच्या माध्यमातून प्रवासी आपले तिकीट आरक्षित करू शकतात, अशी माहिती विभागीय वाहतूक अधिकारी पी़ एस़ नेहूल यांनी दिली़ आजपर्यंत दहा गाड्या उपलब्ध झाल्या आहेत़ उर्वरित गाड्या उपलब्ध झाल्यानंतर कोल्हापूर, नागपूर, पंढरपूर मार्गावर सोडल्या जातील़

Web Title: Muhurat finally completes his journey on Shiva Shahi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.