शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती ची चावी अपक्षाच्या हाती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2018 00:27 IST

मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेकांना आश्चर्यचकीत करणारे निकाल पाहावयास मिळाले. काही गणात धक्कादायक निकाल लागले आहेत़ तर काही प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. मुदखेड नगरपरिषदेनंतर आता मुदखेड बाजार समितीची चावी आता अपक्ष विजयी उमेदवार भांगे म्हैसाजी यांच्या हाती येण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुदखेड : मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत अनेकांना आश्चर्यचकीत करणारे निकाल पाहावयास मिळाले. काही गणात धक्कादायक निकाल लागले आहेत़ तर काही प्रस्थापितांनी आपले गड राखले आहेत. मुदखेड नगरपरिषदेनंतर आता मुदखेड बाजार समितीची चावी आता अपक्ष विजयी उमेदवार भांगे म्हैसाजी यांच्या हाती येण्याची शक्यता आहे.मुदखेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची मतमोजणी रविवारी सकाळी १० वाजता येथील तहसील कार्यालयात सुरू करण्यात आली. एकूण पाच फेरीत मतमोजणी झाली. दुपारी ३़३० पर्यंत एकूण १८ जागाचे सर्वच निकाल निवडणूक निर्णय आधिकारी सुरेश घोळवे यांनी घोषित केले आहे. या निकालावरून तालुक्यात काँग्रेसला अनेक जागेवर चांगलाच हादरा बसला असून शिवसेना-भाजपा युतीने या निवडणुकीत कमबॅक केले आहे. काँग्रेसचा गड असलेल्या या तालुक्यात प्रस्थापितांना अनेक ठिकाणी धक्के बसले आहेतबालाजी खटींग यांना १२९ फेरोज खाँ यांना १२३ मते मिळाली़ या गणातून युतीचे बालाजी खटींग विजयी झाले. पार्डी-वैजापूर गणात एकूण मतदान ५३६ झाले़ यामध्ये हौसरे यांना २६९ तर कसबे यांना २५० मते मिळाली़ येथे युतीचे हौसरे विजयी झाले.निवघा गण क्रं.१ मध्ये एकूण मतदान ३७४ झाले़ उद्धवराव पवार यांना ३०२ तर पूरभाजी पवार यांना ७२ मते मिळाली़ येथे काँग्रेसचे उद्धव पवार विजयी झाले. निवघा क्रं.२ गणात एकूण मतदान ३४९ झाले़ चव्हाण कैलास यांना २५३ तर पानेवार पद्ममिनबाई यांना ९० मते मिळाली़ या गणातून निवघावासियांच्या आशीर्वादाने काँग्रेसचे चव्हाण कैलास यांना विजय खेचून आणला़मुदखेड गणात एकूण मतदान ३६८ झाले़ चौधरी पृथ्वीराज यांना ३०६ तर मुंगल बालाजी यांना ५८ मते मिळाली. यामध्ये चौधरी पृथ्वीराज विजयी झाले. मुदखेड गणात एकूण मतदान ३३९ झाले. युतीचे शेट्टे सुरेश यांना १६८ तर काँग्रेसचे सूर्यवंशी गोंविद यांना १६६ मते मिळाली. या अटीतटीच्या लढतीत २ मतांनी युतीचे शेट्टे सुरेश विजयी ठरले. मुदखेड गणात एकूण मतदान ३४१ झाले़ चौधरी पुष्पाबाई यांना १७६ तर चंद्रे संगिता यांना १५६ मते मिळाली. या गणात युतीच्या चौधरी पुष्पाबाई विजयी झाल्या.ईजळी गणात एकूण मतदान ४३२ झाले़ काँग्रेसचे मुंगल तेजाबराव यांना २३६ तर युतीचे मुंगल बाळु यांना १८७ मते मिळाली. या गणात काँग्रेसचे मुंगळे तेजाबराव विजयी झाले. चिकाळा गणात एकूण मतदान ४७० झाले. यामध्ये इंगोले बाबुराव यांना २३२ देशमुख भगवान यांना २२७ मते मिळाली़ या गणात काँग्रेसचे इंगोले बाबुराव यांनी बाजी मारली. डोणगाव गणात एकूण ४९१ मतदान झाले. युतीचे तेलंगे बाबू यांना २६७ तर काँग्रेसचे पांचाळ मारोती यांना २१७ मते मिळाली़ या गणात युतीचे तेलंगे बाबु दणदणीत विजयी झाले. डोणगाव क्रं.२ गणात एकूण ५१३ मतदान झाले. यात अपक्ष गंडस उत्तम यांना ७८ तर काँग्रेसचे बोडके काशिनाथ यांना २२८ तर युतीचे अशोक हामंद यांना १९९ मते मिळाली़ या गणातून काँग्रेसचे बोडखे विजयी झाले.पांगरगाव गणात एकूण ४२४ मतदान झाले़ यात काँग्रेसच्या गाढे अनुसयाबाई यांना १८२ तर युतीच्या पार्वतीबाई गाढे यांना २१८ मते मिळाली. या गणातून युतीच्या पार्वतीबाई गाढे विजयी झाल्या. पिंपळकौठा (चोर) गणात एकूण ३९८ मतदान झाले़ यात अपक्ष आडे वामन यांना ८८, काँग्रेसचे सूर्यवंशी विजय १७४ तर युतीचे दिवटेवाड गोंविद यांना १२६ मते मिळाली.या गणातून काँग्रेसचे सूर्यवंशी विजय यांनी बाजी मारली. या ठिकाणी उपविभागीय अधिकारी चांडक निवडणूक निर्णय अधिकारी सुरेश घोळवे, नायब तहसीलदार भोसीकर, कर्मचारी उपस्थित होते. तहसील कार्यालयाच्या आवती भोवती पोलीस बंदोबस्त तगडा ठेवण्यात आला होता. मुदखेड स्टेशनचे पोलीस निरीक्षक रमेश स्वामी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

  • व्यापारी आडते मतदार संघातील दोन जागासाठी एकूण १४६ मतदान झाले होते. यात गाढे संदीप यांना ११६, पांचाळ गोपीनाथ यांना ११, पिन्नलवार ईश्वर ५२, मोटारवार पद्माकर यांना १०५ असे मते मिळाली़ यात काँग्रेसचे गाडे संदीप आणि मोटारवार पद्माकर विजयी झाले. शेवटच्या फेरीत हमाल-मापाडी मतदारसंघाची मोजणी झाली़ या संघात एकूण ३३ मतदान झाले़ यामध्ये काँग्रेसचे शेवटे मनिष यांना १७ तर युतीचे बोडके गंगाधर यांना १५ या ठिकाणी अटीतटीची लढत होऊन एका मताने काँग्रेसचे शेवटे मनिष यांनी विजय मिळविला.

---

  • व्यापारी आडते मतदार संघातील दोन जागासाठी एकूण १४६ मतदान झाले होते. यात गाढे संदीप यांना ११६, पांचाळ गोपीनाथ यांना ११, पिन्नलवार ईश्वर ५२, मोटारवार पद्माकर यांना १०५ असे मते मिळाली़ यात काँग्रेसचे गाडे संदीप आणि मोटारवार पद्माकर विजयी झाले. शेवटच्या फेरीत हमाल-मापाडी मतदारसंघाची मोजणी झाली़ या संघात एकूण ३३ मतदान झाले़ यामध्ये काँग्रेसचे शेवटे मनिष यांना १७ तर युतीचे बोडके गंगाधर यांना १५ या ठिकाणी अटीतटीची लढत होऊन एका मताने काँग्रेसचे शेवटे मनिष यांनी विजय मिळविला.

---

  • आज मतमोजणीच्या दिवशी तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी होती. निकाल जाहीर होईपर्यंत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता ताणलेली होती. शेतकरी मतदारसंघातील पाढंरवाडी गणात एकूण मतदान ४४८ झाले होते. काँग्रेसचे माधव खांडरे यांना १८१ आणि चित्तलवाड गोंविद यांना २५६ मते मिळाली. या गणातून युतीचे चित्तलवाड गोंविद विजयी झाले. शेंबोली गणात एकूण मतदान २५६ झाले़
टॅग्स :NandedनांदेडMarket Yardमार्केट यार्डElectionनिवडणूकPoliticsराजकारण