महावितरणचा ‘शॉक’; मीटर रीडिंग घेण्यास होतोय उशीर, पाचशे-सहाशेंचा बसतो फटका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:14+5:302021-07-28T04:19:14+5:30
बिले वाटप करतात एजन्सीचे कर्मचारी... जिल्ह्यात एका एजन्सीमार्फत रीडिंग घेण्याचे काम होते. त्याच कंपनीमार्फत ग्राहकांना वीज बिलेही वाटप ...

महावितरणचा ‘शॉक’; मीटर रीडिंग घेण्यास होतोय उशीर, पाचशे-सहाशेंचा बसतो फटका !
बिले वाटप करतात एजन्सीचे कर्मचारी...
जिल्ह्यात एका एजन्सीमार्फत रीडिंग घेण्याचे काम होते. त्याच कंपनीमार्फत ग्राहकांना वीज बिलेही वाटप केली जातात. वेळेवर वीज बिल वाटप न झाल्यास त्याबाबत कारवाईही केली जाते. वेळेवरच सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याचे बंधन एजन्सीवर आहे. त्यामुळे निष्काळजीपणा होत नसल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.
ऑनलाइन रीडिंग
जिल्ह्यात इन्फ्रा पद्धतीचे अत्याधुनिक वीज मीटर बसविण्यात आले आहे. या मीटरमध्ये ऑनलाइन पद्धतीने जीपीएसच्या माध्यमातून रीडिंग घेण्याची सुविधा आहे. त्यामुळे मानवी हस्तक्षेपालाही वाव मिळत नाही. त्याचवेळी तांत्रिकदृष्ट्याही रीडिंग घेणे सुलभ होते. वीज बिलेही वेळेतच वाटप होतात.
-जे.एल. चव्हाण,
शहर अभियंता
० ते १०० युनिट
शून्य ते शंभर युनिटसाठी ३ रुपये ४४ असा वीज दर आहे. एप्रिल २०२१ पासून हे दर महावितरणने निश्चित केले आहे.
३०१ पासून ५०० युनिट
३०१ ते ५०० युनीटपर्यंत १० रुपये ३६ पैसे असा वीज दर आहे. उशिरा रीडिंग घेतल्याने वाढीव वीज बिल ग्राहकांच्या माथ्यावर पडते. ते अदा न केल्यास वीज पुरवठा बंद होतो.
१००० युनिटपुढे
एक हजार पुढील युनिट असेल तर त्यासाठी ११ रुपये ८२ असे वीज दर आहेत, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले.