सुसंवाद संकल्पनेमुळे ४८ कोटींचा वीज बिल भरणा महावितरण; एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाइनला पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST2021-01-01T04:13:06+5:302021-01-01T04:13:06+5:30

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीज बिले ...

MSEDCL pays electricity bill of Rs 48 crore due to communication concept; One lakh five thousand customers prefer online | सुसंवाद संकल्पनेमुळे ४८ कोटींचा वीज बिल भरणा महावितरण; एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाइनला पसंती

सुसंवाद संकल्पनेमुळे ४८ कोटींचा वीज बिल भरणा महावितरण; एक लाख पाच हजार ग्राहकांची ऑनलाइनला पसंती

कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता वीज बिलाच्या थकबाकीसाठी महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत नाही. वीज ग्राहकांनी वीज बिले भरण्यासाठी स्वत:हून पुढे यावे यासाठी विनंती, सूचना, पत्रव्यवहार, व्हॉट्सॲप, एक गाव एक दिवस उपक्रम, एसएमएस व प्रत्यक्ष भेट घेऊन सुसंवाद साधण्याचा उपक्रम महावितरण गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने राबवत आहे. नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी परिमंडळातील सर्व विभागप्रमुख तसेच उपविभागीय अधिकारी, कर्मचारी यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कोविड-१९ च्या सर्व निर्देशांचे पालन करत वीज ग्राहकांना कसल्याही प्रकारचा त्रास न देता सुसंवाद साधत थकबाकी वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. वीज ग्राहकांनीही सकारात्मकतेने या मोहिमेस उत्तम प्रतिसाद देत वीज देयकांचा भरणा केला आहे.

डिसेंबरमध्ये नांदेड परिमंडळातील १ लाख ५ हजार ४९२ वीज ग्राहकांनी ऑनलाइनच्या माध्यमातून १७ कोटी ९१ लाखांचा भरणा केला आहे. तर १ लाख ६४ हजार २५ वीज ग्राहकांनी प्रत्यक्ष वीज बिल भरणा केंद्रावर जाऊन ३० कोटी ६२ लाख रुपयांचा भरणा केला आहे. नांदेड परिमंडळाअंतर्गत येणाऱ्या नांदेड मंडळातील १ लाख ७७ हजार ७१५ वीज ग्राहकांनी ३१ कोटी ५ लाख रुपये तर परभणी मंडळातील ५० हजार १९३ वीज ग्राहकांनी १० कोटी ८५ लाख रुपये भरणा केला आहे. त्याचबरोबर हिंगोली मंडळातील ४१ हजार ६०९ वीज ग्राहकांनी ६ कोटी ६३ लाख रुपयांचा वीज बिल भरणा केला आहे.

अखंडित वीजसेवा देण्यासाठी महावितरणची आर्थिक स्थिती सुधारणे खूप गरजेचे आहे. सध्या सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाल्यामुळे आता वीज ग्राहकांनी थकबाकी व चालू देयक भरण्यासाठी पुढे आले पाहिजे. एकरकमी वीज बिल भरणे शक्य नसल्यास नियमाप्रमाणे वीज बिल हप्त्याने भरण्याची सुविधाही देण्यात येत आहे. तसेच वीज बिल भरण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. सुसंवाद मोहिमेस चांगला प्रतिसाद मिळत असून यापुढेही वीज बिल भरण्यात सातत्य ठेवावे.

- दत्तात्रय पडळकर, मुख्य अभियंता, नांदेड परिमंडळ

Web Title: MSEDCL pays electricity bill of Rs 48 crore due to communication concept; One lakh five thousand customers prefer online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.