शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
2
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
3
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
4
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
5
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
6
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
7
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
8
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
9
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
10
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
11
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
12
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
13
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
14
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
15
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
16
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
17
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
18
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
19
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
20
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."

रेल्वे प्रश्नावरील नांदेडची खासदारांची बैठक औरंगाबादला हलविण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 18:19 IST

raosaheb danve news :‘दमरे’च्या नांदेड विभागांतर्गत धर्माबादपासून ते मनमाड आणि परळीपासून ते खांडवापर्यंत परिसर येतो.

ठळक मुद्देरेल्वे प्रशासनाकडून याबाबत दुजोरा मिळाला आहेमराठवाड्यातील रेल्वे प्रश्न सुटण्याची अपेक्षा

- श्रीनिवास भोसले

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत येणाऱ्या खासदारांची रेल्वे प्रश्नावर दरवर्षी नांदेडात होणारी बैठक औरंगाबादमध्ये घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. रावसाहेब दानवे हे नव्यानेच केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री झाल्याने त्यांच्या भागात बैठक घेण्याचा घाट रेल्वे प्रशासनाने घातला आहे. या बैठकीचा उद्देश सफल होऊन राज्यमंत्र्यांमुळे मराठवाड्यातील रेंगाळलेले रेल्वे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा आहे.

‘दमरे’च्या नांदेड विभागांतर्गत धर्माबादपासून ते मनमाड आणि परळीपासून ते खांडवापर्यंत परिसर येतो. जवळपास ११ खासदारांना रेल्वेकडून निमंत्रित केले जाते. यामध्ये नांदेडच्या खासदारांसह अदिलाबाद, परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक-दिंडोरी, हिंगोली, वाशिम, अकोला, खांडवा या लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी तसेच विद्यमान राज्यसभा खासदारांचाही समावेश असतो. दरवर्षी नांदेडात घेण्यात येणाऱ्या या बैठकीकडे अर्ध्याहून अधिक खासदार पाठ फिरवितात, तर उपस्थित खासदारही रेल्वेचे अधिकारी प्रांतिक भेदभाव करून मराठवाड्यातील प्रश्नाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप करत बैठकीवर बहिष्कार टाकण्याची भाषा करतात. या बैठकीत वर्षानुवर्षांपासून मांडले जाणारे अनेक प्रश्न सोडविले जात नसल्याने बैठकीला काय अर्थ? केवळ चहापानासाठी बैठक असते काय, असा सवालही उपस्थित खासदारांकडून मागील बैठकीत रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना करण्यात आला होता. दरम्यान, खासदारांकडून मांडलेल्या अनेक प्रश्नांची आजपर्यंत रेल्वे बोर्डाने दखल घेतलेली नाही. आजही मुदखेड ते मनमाड विद्युतीकरणाचा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. तसेच मनमाड ते मुदखेड दुहेरीकरणाचे कामही अर्धवट अवस्थेत आहे. नांदेड-बीदर रेल्वेमार्ग यासह विविध मागण्या प्रलंबितच आहेत.

हेही वाचा - उत्तर महाराष्ट्र, विदर्भाला झुकते माप; मराठवाड्याच्या सिंचन प्रकल्पांसाठी आखडला हात

अधिकाऱ्यांकडून प्रांतिक दुजाभाव, रेल्वेमंत्री पदामुळे अपेक्षा उंचावल्यानांदेड विभाग मध्य रेल्वेला जोडण्यात यावा, जेणेकरून मुंबई, पुण्यासाठी रेल्वे वाढविण्यासह प्रलंबित रेल्वे प्रश्न मार्गी लागतील, अशी मागणी दरवर्षी बैठकीत खासदारांकडून करण्यात येते. तसेच विभागातील तसेच दक्षिण मध्य रेल्वेत असलेल्या अधिकाऱ्यांकडून प्रांतिक भेदभाव करून मराठवाड्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जाते, असा आरोपही खासदारांकडून होतो. परंतु, पहिल्यांदाच रेल्वेचे राज्यमंत्री पद मराठवाड्याला मिळाले आहे. त्यामुळे यंदाच्या बैठकीत खासदारांकडून मांडलेले प्रश्न तरी मार्गी लागतील, अशी अपेक्षा खासदारांना आहे.

खासदारांना निमंत्रण नांदेडचे‘दमरे’च्या नांदेड विभागीय व्यवस्थापक कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या खासदारांना ८ ऑक्टोबर रोजी नांदेडात बैठक असल्याचे पत्र पाठविण्यात आले आहे. परंतु, त्यानंतर बैठकीचे स्थळ बदलण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याच्या वृत्ताला रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे.

हेही वाचा - ‘यूपीएससी’त मराठवाडा चमकला; लातूर ५, नांदेड आणि बीडचे ३ तर हिंगोलीचा एकजण यशस्वी

टॅग्स :railwayरेल्वेMarathwadaमराठवाडाraosaheb danveरावसाहेब दानवे