शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सातव्या वेतन आयोगानुसार राज्यात वेतनश्रेणी लागू करण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 13:19 IST

सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारी महिन्याच्या पगारापासूनच मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

ठळक मुद्देप्रशासन लागले कामाला २४ तासांत मेलवर माहिती पाठविण्याचे आदेश३० जानेवारी रोजी सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी

- विशाल सोनटक्के नांदेड : जानेवारीपासून सातव्या वेतन आयोगानुसार प्रत्यक्ष लाभ देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत. ग्रामविकास विभागाने सोमवारी नांदेडसह राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना तातडीचे पत्र पाठवून संवर्गनिहाय माहिती मागविली आहे. सदर माहिती उद्या मंगळवारी दुपारी दोन वाजेपर्यंत मेलद्वारे तात्काळ सादर करा, असे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळेच सातव्या वेतन आयोगाचा प्रत्यक्ष लाभ फेब्रुवारी महिन्याच्या पगारापासूनच मिळण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्याच्या वित्त विभागाने ३० जानेवारी रोजी सातव्या वेतन आयोगाची अधिसूचना जारी केली आहे. या आयोगानुसार राज्यातील १७ लाख अधिकारी-कर्मचारी आणि ७ लाख पेन्शनर्संना याचा लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांच्या वेतनात सुमारे २३ टक्क्यांची वाढ होणार आहे. वेतन आयोगाचा शासन निर्णय जाहीर झाल्यापासून कर्मचाऱ्यांना आता या आयोगाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची प्रतीक्षा लागलेली असतानाच सोमवारी  जिल्हा परिषदेतील गट ‘क’ व गट ‘ड’ या संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यासाठीची माहिती शासनाने मागविली आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी  अधिकाऱ्यांनी आपल्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदेत १७२ संवर्ग कार्यरत आहेत किंवा कसे, काही संवर्ग कमी झाले असल्यास किंवा इतर संवर्गामध्ये समाविष्ठ झाले असल्यास तशी माहिती द्यावी, जि. प. मध्ये काही संवर्ग वाढले असल्यास त्यांच्या पदनामाचीही माहिती देण्यास सांगितले आहे. ही माहिती मंगळवार, १२ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत मेलद्वारे सादर करण्याच्या सूचनाही ग्रामविकास विभागाने जि.प. सीईओंना दिल्या आहेत.

थकबाकीकडे कर्मचाऱ्यांच्या नजरासातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी शासनाला २०१६, २०१७ आणि २०१८ या तीन वर्षांची थकबाकी द्यायची आहे.   सहाव्या वेतन आयोगावेळी पाच टप्प्यांत थकबाकी देण्यात आली होती. यावेळी ही थकबाकी तीन टप्प्यात द्यावी, अशी कर्मचारी संघटनांची मागणी आहे. शासन या बाबत काय निर्णय घेते, याकडेही कर्मचाऱ्यांच्या नजरा आहेत.

टॅग्स :State Governmentराज्य सरकारEmployeeकर्मचारीMONEYपैसा