शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

'माय एक नाव राहस,गजबजलेले गाव राहस'; बोली भाषांचे बोट धरून माय मराठीला समृद्ध करणारा धनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 20:24 IST

शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.  

- शिवराज बिचेवार 

नांदेड : माय मराठी जगली पाहिजे आणि विस्तारलीही पाहिजे, हे आता बोलून गुळगुळीत झालं आहे. पण, कमळेवाडीतील भटक्या-विमुक्तांच्या आयुष्यात ज्ञानप्रकाश पोहोचविणाऱ्या शाळेत माय मराठीला समृद्ध करणारा धनी राबतोय. शिवाजी अंबुलगेकर या ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या मदतीने बोली भाषांचे बोट धरून मराठीला वंचितांपर्यंत पोहोेचलंय.  

मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे भटक्या-विमुक्त समाजातील ८० विद्यार्थ्यांना शिक्षण देणारी शाळा उभी आहे. ५ वी १२ वीपर्यंत निवासी शिक्षणाची व्यवस्था या ठिकाणी आहे़ या शाळेत उपलब्ध बोलीभाषेतील शब्दांच्या आधारे कवितांचे भाषांतर करण्यात येते़ या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांना आपल्या मातृभाषेसोबतच मराठीचीही गोडी वाटू लागली़ शब्दसंग्रहातही वाढ झाली़ ७ वीच्या पुस्तकातील शशिकांत शिंदे यांच्या ‘माणूसपण गोठलंय’ या कवितेचा गोरमाटी अनुवाद बंडू जाधव या विद्यार्थ्याने केला़ 

आंगाड्या कसो पाळीरो काळचार मिना रेतो तोहारोगार रानू देकन मणक्या खुशीमं हासतो तो  

अशाप्रकारे ५ वी ते १२ वी पर्यंतच्या अनेक कवितांची गोरमाटी, अहिराणी, वडार, कानडी, हिंदी, पारधी भाषेत विद्यार्थ्यांनी भाषांतरे केली़ फ.मुं. शिंदे यांची आई ही कविता विवेक पाटील या विद्यार्थ्याने अहिराणी भाषेत अनुवादित केली़

माय एक नाव राहसघरमा नि घरमा गजबजलेले गाव राहसबठासमा राहस तबय जानवस नयीआते नयी कोठेच तरी बी नही म्हणवस नयी़

लोकसाहित्याचे संकलन शब्दाप्रमाणे बोलीभाषेतील लोकसाहित्य अडगळीला पडले आहे़ उन्हाळ्याच्या सुट्टीत जाताना लोकगीते, लोक म्हणी, वाक्यप्रचार यांचे संकलन करण्याचा प्रकल्प विद्यार्थ्यांना दिला जातो़ तसेच ज्यांच्याकडून हे संकलित करावयाचे आहे़ अशा व्यक्तीकडून ते जसे उच्चारले तसेच लिहून घेतले जावे़ म्हणजे त्या बोलीचा हेल आणि लहेजा कायम राहील याची दक्षता घेतली़ या प्रकल्पांतर्गत अनेक गाणी आणि इतर साहित्य विद्यार्थ्यांनी संकलित केले़ 

अंबुलगेकर भरवितात विविध प्रयोगांची ‘शाळा’या ठिकाणी गोरमाटी, कैकाडी, वडार, वासुदेव, पारधी, मसनजोगी यासारख्या जातीतील विद्यार्थ्यांची मातृभाषा वेगवेगळी आहे़ त्यामुळे मराठी प्रमाण भाषेतील शिक्षण त्यांच्या आकलन कक्षेत येत नाही़ ही बाब शिक्षक शिवाजी अंबुलगेकर यांनी हेरली़ त्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यास त्यांनी सुरुवात केली़ त्यातूनच मराठी कविता बोलीभाषेत अनुवादित करण्याची कल्पना त्यांना सुचली़ मराठी कवितेतील कठीण शब्दांचा अर्थ लिहून देताना त्या शब्दांना बोलीभाषेतील पर्यायी शब्द शोधून दिले. 

बोलींचे शब्दकोशशाळेतील गोरमाटी, वडारी, अहिराणी, पारधी भाषा बोलणाऱ्या विद्यार्थ्यांचे वेगवेगळे गट तयार करण्यात आले़ त्यांना प्रकल्प देण्यात आले़ स्वयंपाकघरातील वस्तू, शेती कामातील वस्तू, वार-महिन्यांची नावे, उद्योग अशाप्रकारचे त्यांच्या बोलीभाषेतील शब्द, त्यांचे पर्याय संग्रह करण्यास विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला़ त्यातून बोलीभाषेतील शब्दकोशाची संकल्पना आकाराला आली़ जाती-जमातींच्या बोली लिखित स्वरुपात कधीच आल्या नाहीत़ त्या केवळ मौखिक होत्या़ परंतु विद्यार्थ्यांच्या माध्यमातून बोलीभाषेचा शब्दसंग्रह तयार झाला आहे.

टॅग्स :literatureसाहित्यmarathiमराठीzp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षक