शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
2
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
3
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
4
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
5
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा आरोप
6
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
7
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
8
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
9
"तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन?
10
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
11
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
12
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO
13
मतदानानंतर रेशन आणि आधारही हिसकावून घेतील..; राहुल गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल
14
Pooja Kumari : कष्टाचं फळ! भाजी, कपडे विकले, कोरोनात मास्क शिवले; अडचणींवर मात करुन झाली अधिकारी
15
जिओ IPO, AI आणि नवीन उर्जा... मुकेश अंबानी उद्या मोठ्या घोषणा करणार? गुंतवणूकदारांना संधी?
16
बिहारमध्ये हाय अलर्ट, जैश-ए-मोहम्मदचे तीन पाकिस्तानी दहशतवादी नेपाळमधून घुसले
17
सोनं झळाळलं, चांदी कडाडली... दोघांचीही किंमत चांगलीच वधारली! कॅरेटप्रमाणे पटापट चेक करा सोन्याचे लेटेस्ट रेट
18
इंजेक्शन घेऊन वर्ल्ड कप खेळला; आता त्याच्या फिटनेसवर नाही भरवसा! मोहम्मद शमी म्हणाला...
19
TVS: टीव्हीएसचा बाजारात धमाका! स्टायलिश डिझाइनसह ई-स्कूटर केली लॉन्च, जाणून घ्या किंमत
20
Open AI: एआयचा वापर धोकादायक? चॅटजीपीटीमुळे १६ वर्षांच्या मुलाने आत्महत्या केल्याचा आरोप

लग्नात अडसर नको म्हणून आईनेच केला मुलाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 11:11 IST

पतीसोबत फारकत घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना दि. २६ जुलै २०१९ रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली होती. घटनेनंतर तब्बल १४ महिन्यांनी आईसह पाच जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

नांदेड : पतीसोबत फारकत घेतल्यानंतर दुसऱ्यांदा बोहल्यावर चढण्यासाठी आडकाठी ठरत असलेल्या तीन वर्षीय चिमुकल्याचा आईनेच खून केल्याची धक्कादायक घटना दि. २६ जुलै २०१९ रोजी हिमायतनगर तालुक्यातील मौजे खडकी येथे घडली होती. घटनेनंतर तब्बल १४ महिन्यांनी आईसह पाच जणांविरूद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

हिमायतनगर तालुक्यातील बोरगाव येथील अशोक भोजराव तवर यांचा मुलगा संदीप तवर याचा विवाह खडकी येथील कांताबाई यांच्याशी झाला होता. परंतु संदीप तवर शरिरयष्टीने कमकुवत असल्याने दोघांमध्ये नेहमी खटके उडत होते. दि. २८ मार्च २०१३ रोजी या दाम्पत्याला मुलगा झाला. परंतु अपत्य झाल्यानंतरही कांताबाई यांचे संसारात मन रमत नव्हते. दोघांमधील वाद विकोपाला गेल्यानंतर कांताबाई यांनी हिमायतनगर न्यायालयात पोटगीसाठी अर्ज दाखल केला. त्यानुसार त्यांना पोटगीही मंजूर झाली. संदीप तवर यांनी न्यायालयाला शिवप्रसाद या मुलाचा ताबा मागितला होता. परंतु तो लहान असल्यामुळे आईकडेच त्याचा ताबा देण्यात आला.

परंतु तीन वर्षाचा शिवप्रसाद हा कांताबाई यांना मनासारखे स्थळ मिळण्यास अडसर ठरत होता. त्यामुळे कांताबाई यांनी दि. २३ जुलै २०१९ रोजी कुटुंबातील इतर सदस्यांच्या मदतीने मुलाला विष पाजले. उपचारादरम्यान दि. २६ जुलै रोजी शिवप्रसादचा मृत्यू झाला. या प्रकरणात तब्बल १४ महिन्यानंतर शिवप्रसादचे आजोबा अशोक भोजराव तवर यांनी हिमायतनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरुन शिवप्रसादची आई कांताबाई, सुनंदाबाई दत्तराव सुर्यवंशी, दत्तराव देवराव सुर्यवंशी, देवराव सुर्यभान सुर्यवंशी आणि ममता दत्तराव सुर्यवंशी सर्व रा.खडकी बाजार या पाच जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सपोनि बालाजी महाजन हे करीत आहेत

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखूनMarathwadaमराठवाडा