शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी- योगी भाषण देत होती - छगन भुजबळ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 20:43 IST

राफेलच्या चौकशीने 56 इंच ची छाती थरारली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

नांदेड : पुलवामा येथील दहशतवादी हल्ला ही घटना गंभीर आहे. त्यावेळी प्रियंका यांची पहिली प्रेस होणार होती, त्यांनी ती रद्द केली. मात्र, त्याचवेळी मोदी, योगी अन शहा वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे करीत होते, तर मुख्यमंत्री युतीची वाटाघाटी करीत होते. आता यामध्ये समजदार कोण ? अशी खरमरीत टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी आज येथे केली

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या महाआघाडीच्या प्रचाराचा प्रारंभ आज नांदेड येथून होत आहे. या निमित्ताने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत शहरातील इंदिरा गांधी मैदानावर संयुक्त सभा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलताना भुजबळ म्हणाले, भाजपने सत्तेत येण्यापूर्वी लाहोरपर्यंत घुसणार, अशा घोषणा केल्या होत्या, त्यावेळी ते तत्कालीन सरकारवर टीका करत. याउलट पुलवामा हल्ल्यानंतर राहूल गांधी यांनी आम्ही सर्व देशासोबत आहेत असे सांगितले. ही घटना गंभीर आहे. त्यावेळी प्रियंका यांची पहिली प्रेस होणार होती, त्यांनी ती रद्द केली. मात्र, त्याचवेळी मोदी, योगी अन शहा वेगवेगळ्या ठिकाणी भाषणे करीत होते, तर मुख्यमंत्री  युतीची वाटाघाटी करीत होते. आता यामध्ये समजदार कोण ? अशी खरमरीत टीका यावेळी भुजबळ यांनी केली. 

राफेलने '५६ इंची' छाती थरथरली मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या पत्रकारांना बाहेरचा रास्ता दाखविण्यात येत आहे. सरकारने सर्व स्वायत्त संस्था मोडीत काढल्या, सीबीआयची मुस्कटदाबी केली असून देशात हुकूमशाही सुरू आहे. मोदी हे, 'आम आदमी से मन की बात अन अंबानी से धन की बात' करतात. राफेलच्या चौकशीने 56 इंच ची छाती थरारली असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळNCPराष्ट्रवादी काँग्रेसNandedनांदेड