शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

"आम्ही संविधान वाचवले म्हणून मोदी पंतप्रधान झाले", मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 08:47 IST

Mallikarjun Kharge : काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले.

नांदेड : कन्याकुमारीपासून निघालेल्या खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचे नांदेडकरांनी जोरदार स्वागत केले. कुठे डोक्यावर पुष्पवृष्टी तर कुठं गुलाबांच्या पाकळयांच्या पायघड्या पाहुन भारत जोडो यात्रीही भाराहून गेले. दरम्यान, काँग्रेसचे (Congress) अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) यांनी नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला. 

काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले. काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले नसते तर नरेंद्र मोदी कधीच पंतप्रधान झाले नसते, असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. याशिवाय, बेरोजगारीचा मुद्दा उपस्थित करत केंद्र सरकारला सवाल केला. दरवर्षी 2 कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले? आता फक्त 75,000 नोकऱ्या देत आहेत. 18 कोटी नोकऱ्या कुठे आहेत? असे मल्लिकार्जुन खरगे म्हणाले. 

"भाजप नेते अनेकदा विचारतात की, काँग्रेसने देशासाठी काय केले. काँग्रेस सरकारने स्थापन केलेल्या पीएसयू आता विकल्या जात आहेत. आम्ही संविधान वाचवले, म्हणून तुम्ही पंतप्रधान झालात", असे म्हणत मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. तसेच, मोदी सरकार विमानतळ आणि बंदरे विकत असून देशाची संपत्ती काही निवडक लोकांच्या हातात जात असल्याचा आरोप मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.

हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही - राहुल गांधीविमान किंवा हेलिकॉप्टरमध्ये फिरून लोकांचे दुःख समजणार नाही. आजघडीला देशातील सर्व पैसा तीन ते चार उद्योगपतींच्या घशात घालण्यात येत आहे. त्यामुळे शाळांमध्ये संगणकसुद्धा नाहीत. इकडे पंपचे बटन दाबले की तिकडे तुमच्या खिशातील पैसा थेट उद्योगपतींकडे जातो, अशा शब्दांत काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात झालेल्या पहिल्या जाहीर सभेत हल्लाबोल केला.  

...अन् मुलांना टॅब दाखविलासॉफ्टवेअर इंजिनीअर बनण्याचे ध्येय असलेल्या विद्यार्थ्यांना जेव्हा राहुल गांधी यांनी कॉम्प्युटर बघितले का? असे विचारले, तेव्हा विद्यार्थ्यांनी नाही, असे सांगताच रस्त्याच्या एका कठड्यावर बसून राहुल गांधींनी या विद्यार्थ्यांना स्वत:जवळचा टॅब दाखविला. भारत जोडो यात्रा नांदेड शहराकडे येत असताना गुरुवारी हा प्रसंग घडला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBharat Jodo Yatraभारत जोडो यात्राcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीNandedनांदेड