घुंगराळा येथे मोबाईलचे दुकान फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:23 IST2021-08-20T04:23:02+5:302021-08-20T04:23:02+5:30

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला जिल्ह्यात विमानतळ आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विद्युतनगर येथून संजय ...

Mobile shop blown up at Ghungrala | घुंगराळा येथे मोबाईलचे दुकान फोडले

घुंगराळा येथे मोबाईलचे दुकान फोडले

जिल्ह्यात दोन दुचाकी चोरीला

जिल्ह्यात विमानतळ आणि लोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरीला गेल्या आहेत. विद्युतनगर येथून संजय तुकाराम क्षीरसागर, तर लोह्यात कळसकर यांच्या रुग्णालयाबाहेर उभी केलेली सोमपुरी पुरी यांची दुचाकी चोरट्याने लांबविली.

घरासमोरील दोन गायी नेल्या सोडून

शहरातील विनायकनगर भागात १५ ऑगस्ट रोजी घरासमोर बांधलेल्या ५० हजार रुपये किमतीच्या दोन गायी चोरट्यांनी सोडून नेल्या. गजानन गंगवान यांनी दोन दिवस गायींचा शोध घेतल्यानंतर या प्रकरणात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

कोल्हापुरी बंधाऱ्याचे गेट लांबविले

उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाका शिवारात चोरट्यांनी कोल्हापुरी बंधाऱ्याचे ४८ हजार रुपये किमतीचे दहा लाख रुपयांचे लोखंडी गेट चोरट्यांनी लांबविले. ही घटना २८ जुलै रोजी घडली.

माजी सरपंच आबाराव दत्तराम हंबर्डे यांच्या शेतातील आखाड्यावर घुंगराळा शाखेतील कार्यक्षेत्रातून वाका कोल्हापुरी बंधाऱ्यावरील १२ गेट काढून ठेवण्यात आले होते. त्यातील १० गेट चोरट्यांनी लांबविले. याप्रकरणात कालवा निरीक्षक विकास चिंतरवाड यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.

दोन ठिकाणी जुगार अड्ड्यांवर धाडी

शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत नालंदानगर पाटीजवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड मारली. यावेळी दीड हजार रुपये जप्त केले, तर इस्लापूर हद्दीत शिवाजी चौक भागातून दीड हजार रुपये जप्त करण्यात आले.

Web Title: Mobile shop blown up at Ghungrala