शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

परवानगीविनाच गौण खणिजाचे उत्खनन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:11 AM

कोणतीही परवानगी न घेता तसेच अकृषिकचे प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यांपासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा प्रकार नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे सुरू आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले.

ठळक मुद्देकारवाई होईना : गावकऱ्यांनी केली शेतीचे नुकसान होत असल्याची तक्रार

नांदेड : कोणतीही परवानगी न घेता तसेच अकृषिकचे प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यांपासून गौण खनिजाचे उत्खनन सुरू असल्याचा प्रकार नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे सुरू आहे. या प्रकरणात गावकऱ्यांनी तक्रार केल्यानंतरही दुर्लक्ष करण्यात आले. त्याचवेळी जिल्हाधिकारी कार्यालयातून कारवाई करण्याबाबतच्या पत्रालाही केराची टोपली दाखवण्यात आली.नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथे रघुनाथ कमठेवाड यांच्या मालकीच्या गट क्र. ५९५ मधील ४.१७ हेक्टर जमिनीवर एका कंपनीने गिट्टी क्रेशर सुरू केला आहे. या क्रेशरसाठी आवश्यक ती परवानगी जिल्हा गौण खनिज विभागाकडून अद्याप घेण्यात आली नाही. त्याचवेळी नायगाव तहसीलच्या अहवालावरुन आतापर्यंत ५० लाखांहून अधिकची रक्कम जमा करुन घेण्यात आली आहे.या कंपनीकडून गौण खनिज काढण्यासाठी स्फोटही केले जात आहे. याचा कृष्णूर गावकºयांना त्रास सहन करावा लागत आहे. स्फोटामुळे काही घरांना तडेही गेले आहेत. त्याचवेळी क्रेशरच्या धुळीने आजूबाजूची शेती नापीक होत आहे. याबाबत गावकºयांनी नायगाव तहसीलदार तसेच जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली. या तक्रारीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने फेब्रुवारी २०१९ मध्ये नायगाव तहसीलदारांना कारवाईचे पत्र दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आजही कारवाई झाली नाही. त्याचवेळी उत्खननही थांबले नाही. दुसरीकडे परिसरातील शेतीचे धुळीने मात्र अमाप नुकसान होत आहे. यामुळे शेतकºयांच्या उत्पन्नात घट होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे. तसेच धुळीमुळे श्वसनाचे विकारही होत आहेत.या ठिकाणी लाखो ब्रास गौण खनिजाचा साठा केला जात आहे. याकडे महसूलचे अधिकारी का दुर्लक्ष करीत असावे, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, अकृषि प्रमाणपत्र नसतानाही पाच महिन्यापासून अवैध पद्धतीने सुरू असलेल्या या गौण खणिज उत्खनणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी होत असून याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.अकृषिक परवानाच नाहीया कंपनीच्या गौण खनिजाच्या परवानगीसाठी आवश्यक ती कागदपत्रे मागितली होती. ती पूर्ण करण्यात आली नाही. त्यात अकृषिक परवाना ही महत्त्वपूर्ण बाब होती. ती अद्यापही पूर्ण करण्यात आली नाही. असे असतानाही सदर कंपनीकडून गौण खनिजाचा लाखो ब्रास साठा करण्यात आला आहे. त्याचवेळी लाखो ब्रास माल उचलण्यातही आला आहे. २४ तास येथे उत्खननाचे काम सुरू असताना महसूल विभागाचे अधिकारी मात्र हातावर हात ठेवून आहेत.

टॅग्स :NandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड