आजपासून नांदेडात दूध बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 00:27 IST2018-07-16T00:27:42+5:302018-07-16T00:27:59+5:30
:दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशनराव देलूबकर यांनी दिली.

आजपासून नांदेडात दूध बंद आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड :दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान थेट शेतकºयांच्या खात्यात द्यावे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाची जोरदार तयारी नांदेड जिल्ह्यातही झाली आहे. शहराला होणारा दूधपुरवठा हा दूध उत्पादक शेतकरीच बंद करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशनराव देलूबकर यांनी दिली.
दूध संकलन करणाºया संस्थांनी दूध संकलन करू नये, यासाठी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
त्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यातही शहराला होणारा दूध पुरवठा शेतकरी करणार नसल्याचे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, शेतकºयांनी आपले दूध गोरगरिबांना, शाळेतील मुलांना किंवा वारकºयांना वाटण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रल्हाद इंगोले, हणमंत राजेगोरे व किशन देळूबकर यांनी केले आहे.