शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी होंडाळा ग्रामस्थांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 00:56 IST

होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते

दत्तात्रय कांबळे।मुखेड: होंडाळा पाणीपुरवठा करणारे मोठे मुख्य स्त्रोत नसल्यामुळे या गावाला दरवर्षीच तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ नागरिकांना पिण्यासाठी ५ रुपयाला एक घागर खाजगी बोरचे विकत घ्यावे लागते तर गावाजवळील एका तलावातून अशुद्ध पाणी नळाद्वारे सोडले जाते़ तर २ हजार ५०० नागरिकांची टँकरच्या एकाच फेरीवर तहान भागवली जाते़ यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर झाले असल्याचे विदारक चित्र होंडाळा गावात आहे.मुखेड तालुक्यातील जांब बु. बाजारपेठेजवळ असलेले होंडाळा हे गाव २ हजार ५०० लोकसंख्या असलेले व ४०० पेक्षा जास्त कुटुंबसंख्या असलेले ९ ग्रामपंचायत सदस्य संख्या असलेले मोठे गाव असून गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी मोठा स्त्रोत नसल्यामुळे दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. ३० ते ३५ वर्षापूर्वी शासकीय योजनेतून सांगवी बेनक शिवारातील तलावाच्या खाली विहीर खोदून पाणी पुरवठा केला जातो़आजही त्याच ठिकाणाहून ३० ते ३५ वर्षांपासून पाणीपुरवठा गावाला केला जातो़ या सततच्या पाईपलाईन वापरामुळे ही पाईपलाईन कुचकामी झाली असून जागोजागी फुटलेल्या अवस्थेमध्ये दिसून येते़ गावाजवळ कोठेच जलस्त्रोत नाही़ यामुळे एका तलावातून पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये टाकून पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा टाकीत घेतले जाते. हेच अशुद्ध पाणी एक दिवस किंवा दोन दिवसाआड सोडले जाते.अशा दूषित पाण्याच्या वापरामुळे गावांमध्ये आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून पाण्यापासून होणारे रोग कावीळ, कॉलरा अशा वेगवेगळ्या आजारांना नागरिकांना बळी पडावे लागत आहे. ग्रामपंचायतच्या मागणीप्रमाणे दोन पाणी टँकरची मागणी केली आणि दोन टँकरची मंजुरी पण मिळाली; पण आजघडीला गावात एका टँकरने एकच फेरी केली जाते.गावची शेती सुद्धा कोरडवाहू जमीन, खरीपाची शेती असून गावांमध्ये कोणताही उद्योग व्यवसाय नाही. या परिस्थितीमुळे होंडाळातील जवळपास २० टक्के लोक गाव सोडून विटकाम, ऊस काम, पुणे, मुंबई, हैदराबाद, अशा शहरात कामासाठी स्थलांतरित झालेले आहेत़ त्यामुळे गाव ओसाड झाले आहे़येथील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोरचे पाणी गावांमध्ये पाईपलाईन द्वारे आणले असून त्या नळाचे पाणी ५ रुपयाला १ भांडे पाणी याप्रमाणे विक्री करतो. यांना विचारले असता ते म्हणाले की बोअरचे पाणी गावाला पुरत नाही. म्हणून अधिग्रहण करता येत नाही़ यामुळे मी हा उपक्रम सुरू केला असे म्हणाले.

 

टॅग्स :NandedनांदेडWaterपाणीwater scarcityपाणी टंचाई