शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

तीन दिवसांत भूसंपादनाचा मावेजा दया; नांदेड जिल्हाधिकार्‍यांसह तिघांना न्यायालयाचा आदेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 7:35 PM

गुरु -त्ता -गद्दीच्या काळात गुरुद्वारा परिसरात रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने देवूनही तो न दिल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि भूसंपादन अधिकारी या तिघांना दिवाणी न्या़एऩएस़ मोमीन यांनी वॉरंट बजावले असून तीन दिवसांत सदर रक्कम अदा करण्यास सांगितले आहे़ अर्जदाराला तीन दिवसांत रक्कम न दिल्यास वरील तीनही उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर कारवाई होवू शकते़ 

ठळक मुद्दे२००८ मध्ये गुरु -त्ता -गद्दी त्रिशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला़ शहरातील विकासकामांसाठी अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले़जमीन गेलेल्यांना चांगला मावेजा मिळेल असे आश्वासनही त्यावेळी देण्यात आले होते़२०१५ मध्ये न्यायालयाने गुरुबचनकौर यांना संबंधित यंत्रणेने ३ लाख १० हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले होते़

नांदेड : गुरु -त्ता -गद्दीच्या काळात गुरुद्वारा परिसरात रस्ते रुंदीकरणासाठी भूसंपादन करण्यात आलेल्या जमिनीचा मावेजा देण्याचे आदेश न्यायालयाने देवूनही तो न दिल्याने जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि भूसंपादन अधिकारी या तिघांना दिवाणी न्या़एऩएस़ मोमीन यांनी वॉरंट बजावले असून तीन दिवसांत सदर रक्कम अदा करण्यास सांगितले आहे़ अर्जदाराला तीन दिवसांत रक्कम न दिल्यास वरील तीनही उच्चपदस्थ अधिकार्‍यांवर कारवाई होवू शकते़ 

२००८ मध्ये गुरु -त्ता -गद्दी त्रिशताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला़ शहरातील विकासकामांसाठी अनेक ठिकाणी भूसंपादन करण्यात आले़ जमीन गेलेल्यांना चांगला मावेजा मिळेल असे आश्वासनही त्यावेळी देण्यात आले होते़ गुरुद्वारा परिसरात गुरुबचनकौर मदनसिंघ यांची जागा होती़ या जागेचेही संपादन करण्यात आले़ मात्र शासनाने दिलेल्या मावेजावर गुरुबचनकौर समाधानी नसल्याने त्यांनी मावेजा वाढवून मिळावा असा अर्ज न्यायालयात केला़ या प्रकरणात साक्षीपुरावे झाल्यानंतर २०१५ मध्ये न्यायालयाने गुरुबचनकौर यांना संबंधित यंत्रणेने ३ लाख १० हजार रुपये द्यावेत असे आदेश दिले होते़ न्यायालयाच्या निर्णयानंतरही पैसे न दिल्याने शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व भूसंपादन अधिकारी यांना प्रतिवादी करण्यात आले होते़ 

जवळपास तीन वर्षांनंतरही गुरुबचनकौर यांना पैसे देण्यात आले नाहीत़ या प्रकरणात गुरुबचनकौर पुन्हा न्यायालयात गेल्या़ त्यांनी जिल्हाधिकारी, आयुक्त व भूसंपादन अधिकारी यांनी चालढकल केल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकावे अशी विनंती न्यायालयाकडे केली़ न्यायालयाने उपलब्ध साक्षीपुराव्याच्या आधारे तिघांनाही वॉरंट बजावले आहेत़  एखाद्याला दिवाणी तुरुंगात टाकावयाचे असल्यास त्याचा खर्च अर्जदारास करावा लागतो़ त्यानुसार प्रत्येक व्यक्तीस दररोज ६० रुपये असे न्यायालयात भरावे लागतात़ त्यानंतर दिवाणी तुरुंगात ज्याला टाकावयाचे आहे त्याच्याविरोधात पकड वॉरंट जारी होते़ 

विशेष म्हणजे, गुरुबचनकौर यांनी तीन दिवसांचे पैसेही भरले आहेत़ हे पैसे भरल्यानंतरच न्या़मोमीन यांनी तिघांना वॉरंट जारी केले आहे़  दिवाणी न्यायालयाच्या निर्णयानुसार गुरुबचनकौर यांचे पैसे आदेशानुसार दिलेल्या वेळेत अदा केल्यास कारवाई टाळता येवू   शकते़. सदर प्रकरणात महापालिकेने तक्रारकर्त्यांच्या नावे १ लाख ६६ हजार ९९४ रुपयांचा धनादेश अदा केला आहे. २० नोव्हेंबर २०१७ रोजी तो अदा केल्याची माहिती मनपाचे विधि अधिकारी अजितपालसिंघ संधू यांनी दिली. सदर प्रकरणात हिशेबात गफलत झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. याबाबत मंगळवारी न्यायालयात पैसे भरल्याबाबतची माहिती सादर केली जाईल, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :NandedनांदेडCourtन्यायालय