तामश्यात व्यापाऱ्याचे घर फोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:14 IST2021-07-20T04:14:14+5:302021-07-20T04:14:14+5:30

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या तीन घटना जिल्ह्यात रामतीर्थ, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी लांबविण्यात आल्या. आमदपूर फाटा ...

The merchant's house was broken into | तामश्यात व्यापाऱ्याचे घर फोडले

तामश्यात व्यापाऱ्याचे घर फोडले

जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या तीन घटना

जिल्ह्यात रामतीर्थ, विमानतळ आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन दुचाकी लांबविण्यात आल्या. आमदपूर फाटा येथून मल्लिकार्जुन बत्तलवार, शहरात नमस्कार चौक भागात गोविंद गुडमलवाड आणि नवीन मोंढ्यातील एसबीआय बँकेसमोरून सतीश नवघडे यांची दुचाकी चोरीला गेली.

विवाहितेचे खानदान संपविण्याची धमकी

फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून ३० लाख रुपये घेऊन ये नाही तर खानदान संपवितो अशी धमकी देऊन विवाहितेला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात वजिराबाद पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित महिलेला पुणे येथे देण्यात आले होते. परंतु सासरच्या मंडळींनी फ्लॅट घेण्यासाठी माहेराहून ३० लाख रुपये आणण्याची मागणी केली. त्यासाठी पती नेहमी मारहाण करीत असे. तर इतर मंडळी टोमणे मारत होते. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने सासरच्या मंडळींनी पीडितेचे खानदान संपविण्याची धमकी दिली. या प्रकरणात नीरज विठ्ठलसिंह गहेरवार, विठ्ठलसिंह गहेरवार, धीरज गहेरवार, लक्ष्मीबाई गहेरवार, आराधना गहेरवार, शीतल राजपूत आणि सोनल बायस यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

दुचाकीच्या धडकेत महिलेचा मृत्यू

सिडको भागातील ढवळे कॉर्नर येथे दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या विरोधात गुन्हा नोंदविला.

शांताबाई बापूराव गजभारे (५०) ही महिला ९ जुलै रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास गजानन फर्टिलायझरसमोरून पायी घराकडे जात होती. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने (एमएच २६ एव्ही ६८०६) त्यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शांताबाई यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी सुरेखा इंगोले यांनी ठाण्यात तक्रार दिली.

रिटा येथे अवैध दारू पकडली

भोकर तालुक्यातील मौजे रिटा येथे बेकायदेशीरपणे विक्री करण्यासाठी ठेवण्यात आलेली अडीच हजार रुपयांची देशी दारू पोलिसांनी पकडली. १८ जुलै रोजी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Web Title: The merchant's house was broken into