शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
3
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
4
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
5
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
6
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
7
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
8
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
9
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
10
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
11
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
12
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
13
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
14
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
15
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
16
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
17
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
18
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
19
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
20
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य

संभाव्य टंचाई आराखडा करण्यासाठी आज बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 00:07 IST

शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़ गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़

किनवट : किनवट तालुका संभाव्य टंचाई आराखडा तयार करण्यासाठी व टंचाई गावे निश्चित करण्यासाठी १५ नोव्हेेंबर रोजी टंचाई पूर्वबैठक बोलावण्यात आली आहे़ मात्र गतवर्षीचे टंचाई काळात राबवलेल्या मंजूर आराखड्ड्यातील झालेल्या कामांचे पैसे अद्यापही मिळाले नाहीत़ त्यामुळे शासनाची उदासीनता आहे की प्रशासनाची ? याबाबतचे गूढ कायम आहे़गतवर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस पडला होता़ टंचाईचे चित्र सर्वत्र निर्माण झाल्याने संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी टंचाई कृती आराखडा तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे पाठविला़ त्याला मंजुरीही मिळाली़ संबंधित विभागाने टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविल्या़ १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यातून केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे शिल्लक असल्याची माहिती आहे़याशिवाय जि़ प़ च्या पाणी पुरवठा विभागाने गतवर्षी टंचाई काळात मंजूर आराखड्यानुसार टंचाईग्रस्त गावांत नळयोजनेची विशेष दुरुस्ती, पूरक नळयोजना ही कामे केली़ झालेल्या कामांचे पैसे अद्यापही संबंधितांना मिळाले नसल्याने यंदा काम करायला ही यंत्रणा पुढे येईल का ? याबाबत साशंकताच आहे़दरवर्षी टंचाईपूर्व बैठका घेतल्या जातात़ जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून हा टंचाई कृती आराखडा तयार केला जातो़ त्याला मंजुरीही मिळते़ मात्र उपाययोजना राबवूनही केलेल्या कामाचा मावेजा वेळेवर मिळत नाही़ आराखडा मंजूर असतानाही कामे मात्र पावसाळ्याच्या तोंडावर केली जातात़ टंचाईग्रस्त गावकऱ्यांना मात्र पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागतात़ मंजूर आराखड्यातील कामे पूर्ण होऊनही मंजूर निधी देण्यात शासनाची उदासीनता की प्रशासनाची, हे कळायला मार्ग नाही़ यावर्षीही पावसाळ्यात धरसोड पद्धतीने पाऊस झाल्याने विशेषत: इस्लापूर शिवणी व जलधारा या तीन मंडळात पन्नास टक्क्यांच्या आतच पाऊस पडला़ त्यामुळे या भागात टंचाई उग्र रूप धारण करेल, असे सध्याचे चित्र आहे़ तालुक्याच्या अन्य मंडळातही पाणीटंचाईचे चटके बसणार आहेत़३४ लाख रूपये बाकी

  • १९१ गावे, १०५ वाडीतांडे असलेल्या किनवट तालुक्यात गतवर्षी ९५ गावांत १०२ विहिरी अधिग्रहणाचे काम करण्यात आले़ त्यापैकी केवळ सात लक्ष रुपयांची बोळवण करण्यात आली़ अद्यापही ३४ लक्ष रुपये येणे बाकीच आहेत़ त्यामुळे गुरूवारी होणाºया बैठकीकडे लक्ष लागले आहे़
  • ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ संभाव्य टंचाईची गावे निश्चित करण्यासाठी आ़ प्रदीप नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आराखडा बैठक १५ रोजी पं़ स़ च्या सभागृहात होणार आहे़ मात्र उदासीन धोरण राबवणा-या शासनाच्या काळात मंजूर आराखड्यातील कामांना पुन्हा वर्षभर निधीची प्रतीक्षा करावी लागेल का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे़ बैठकीचे फलित संभाव्य टंचाई निर्माण झालेल्या गावांना कितपत मिळणार याकडे लक्ष लागले आहे़
टॅग्स :Nandedनांदेडwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक