शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 01:37 IST

विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते. मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात असल्याने योग्य नियोजनाअभावी पुरेशा पाणीपाळ्या मिळत नसल्याचे सांगत शेतक-यांनी पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवरच नियोजन करण्याची मागणी केली असून पाच पाळ्या पाणी द्या अन्यथा जल सत्याग्रह करु, असा इशारा दिला आहे.विष्णूपुरी प्रकल्प व डिग्रस बंधारा यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे कालव्यांना पाच पाळ्यात पाणी देण्याची शेतकºयांची मागणी आहे. पाण्याच्या पाच पाळ्या दिल्यास रबीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो. मात्र यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजनासाठीच्या बैठका यापूर्वी नांदेड येथेच असर्जन, मारतळा अथवा जानापुरी कॅम्प येथे शेतक-यांच्या उपस्थितीत घेतल्या जात होत्या.मात्र मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात आहेत. मुंबई येथे होणा-या बैठकामुळे शेतक-यांचा कसलाही विचार घेतला जात नाही. पर्यायाने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ऐन टंचाईकाळात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच या बैठका पुन्हा स्थानिक स्तरावर घेण्याची मागणी होत आहे.लोहा, कंधार तालुक्यातील दुष्काळी लाभ क्षेत्रात विष्णूपुरी प्रकल्पाच्या पहिल्या पाणी पाळीला अंदाजे ७ दलघमी पाणी लागते व नंतरच्या ४ पाळ्यांना २० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच २७ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. विष्णूपुरीत सध्या ८४ दलघमी पाणी उपलब्ध असून, डिग्रस बंधाºयातील नांदेड शहरासाठी राखीव असलेले ३० दलघमी पाणी असे एकूण ११४ दलघमी पाणी आहे.विष्णूपुरी प्रकल्पाच्या कालव्यांना २७ दलघमी आणि डेरला लिफ्टसाठी १० दलघमी अशा ३७ दलघमी पाण्यामध्ये दोन्ही प्रकल्पाच्या ५ पाणी पाळ्या होतात. शिवाय नांदेडसाठी ७७ दलघमी पाणी उपलब्ध राहते. प्रशासनाने वरीलप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळी गावांना टंचाईची झळ बसणार नाही. या बरोबरच टँकरचा लाखोंचाही खर्च वाचेल. त्यामुळे पाच पाच पाणी पाळ्या देता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची मागणी प्राध्यापक शिवाजी मोरे सोनखेडकर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.शेतकºयांशी चर्चा करुन निर्णय घ्याविष्णूपुरी प्रकल्प व डेरला लिफ्टच्या कालव्यांना पाणी देण्यासाठीचे नियोजन यापूर्वीच स्थानिक पातळीवर बैठका घेऊन केले जात होते. मात्र मागील वर्षीपासून ज्या शेतक-यांसाठी पाण्याचे नियोजन केले जाते त्या शेतकºयांनाच या बैठकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. मुंबईत बसून नियोजन केले जात असल्याने शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने पाणी नियोजनासाठीच्या बैठका पूर्ववत स्थानिकस्तरावर घ्याव्यात. तसेच पाच पाणीपाळ्यात पाणी नियोजन न केल्यास जलसत्याग्रह करु, असा इशारा शेतकºयांच्या वतीने प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी दिला आहे.

टॅग्स :Nandedनांदेडvishnupuri damविष्णुपुरी धरणWaterपाणी