पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 01:36 AM2018-10-16T01:36:50+5:302018-10-16T01:37:09+5:30

विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते.

Meeting in Mumbai today about water sharing | पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

पाणीवाटपाबाबत आज मुंबईत बैठक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विष्णूपुरी प्रकल्प तसेच डिग्रस बंधारा पाणीवाटपाचे नियोजन यापूर्वी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांसोबत बैठका घेऊन केले जात होते. मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात असल्याने योग्य नियोजनाअभावी पुरेशा पाणीपाळ्या मिळत नसल्याचे सांगत शेतक-यांनी पूर्वीप्रमाणे स्थानिक पातळीवरच नियोजन करण्याची मागणी केली असून पाच पाळ्या पाणी द्या अन्यथा जल सत्याग्रह करु, असा इशारा दिला आहे.
विष्णूपुरी प्रकल्प व डिग्रस बंधारा यंदा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे कालव्यांना पाच पाळ्यात पाणी देण्याची शेतकºयांची मागणी आहे. पाण्याच्या पाच पाळ्या दिल्यास रबीचा तसेच पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटू शकतो. मात्र यासाठी उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजनासाठीच्या बैठका यापूर्वी नांदेड येथेच असर्जन, मारतळा अथवा जानापुरी कॅम्प येथे शेतक-यांच्या उपस्थितीत घेतल्या जात होत्या.
मात्र मागील वर्षीपासून या बैठका मुंबई येथे मंत्रालयात घेतल्या जात आहेत. मुंबई येथे होणा-या बैठकामुळे शेतक-यांचा कसलाही विचार घेतला जात नाही. पर्यायाने पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने ऐन टंचाईकाळात पाणी उपलब्ध होत नाही. त्यामुळेच या बैठका पुन्हा स्थानिक स्तरावर घेण्याची मागणी होत आहे.
लोहा, कंधार तालुक्यातील दुष्काळी लाभ क्षेत्रात विष्णूपुरी प्रकल्पाच्या पहिल्या पाणी पाळीला अंदाजे ७ दलघमी पाणी लागते व नंतरच्या ४ पाळ्यांना २० दलघमी पाण्याची आवश्यकता असते. म्हणजेच २७ दलघमी पाण्याची आवश्यकता आहे. विष्णूपुरीत सध्या ८४ दलघमी पाणी उपलब्ध असून, डिग्रस बंधाºयातील नांदेड शहरासाठी राखीव असलेले ३० दलघमी पाणी असे एकूण ११४ दलघमी पाणी आहे.
विष्णूपुरी प्रकल्पाच्या कालव्यांना २७ दलघमी आणि डेरला लिफ्टसाठी १० दलघमी अशा ३७ दलघमी पाण्यामध्ये दोन्ही प्रकल्पाच्या ५ पाणी पाळ्या होतात. शिवाय नांदेडसाठी ७७ दलघमी पाणी उपलब्ध राहते. प्रशासनाने वरीलप्रमाणे पाण्याचे नियोजन केल्यास दुष्काळी गावांना टंचाईची झळ बसणार नाही. या बरोबरच टँकरचा लाखोंचाही खर्च वाचेल. त्यामुळे पाच पाच पाणी पाळ्या देता येईल अशा पद्धतीने नियोजन करण्याची मागणी प्राध्यापक शिवाजी मोरे सोनखेडकर यांच्यासह शेतकºयांनी केली आहे.
शेतकºयांशी चर्चा करुन निर्णय घ्या
विष्णूपुरी प्रकल्प व डेरला लिफ्टच्या कालव्यांना पाणी देण्यासाठीचे नियोजन यापूर्वीच स्थानिक पातळीवर बैठका घेऊन केले जात होते. मात्र मागील वर्षीपासून ज्या शेतक-यांसाठी पाण्याचे नियोजन केले जाते त्या शेतकºयांनाच या बैठकांपासून दूर ठेवण्यात येत आहे. मुंबईत बसून नियोजन केले जात असल्याने शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत पाणी पोहोचत नाही. त्यामुळे सरकारने पाणी नियोजनासाठीच्या बैठका पूर्ववत स्थानिकस्तरावर घ्याव्यात. तसेच पाच पाणीपाळ्यात पाणी नियोजन न केल्यास जलसत्याग्रह करु, असा इशारा शेतकºयांच्या वतीने प्रा. शिवाजी मोरे सोनखेडकर यांनी दिला आहे.

Web Title: Meeting in Mumbai today about water sharing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.