हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:17 IST2021-04-21T04:17:56+5:302021-04-21T04:17:56+5:30

आडा येथील शेतकरी शंकरराव सूर्यवंशी यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले ...

Mayata's son vandalizes Hadgaon sub-district hospital | हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड

हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात मयताच्या मुलाने केली तोडफोड

आडा येथील शेतकरी शंकरराव सूर्यवंशी यांना श्वासोश्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांची प्रकृती खालावत असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी त्यांना हलविण्यात यावे, अशा सूचना वैद्यकीय अधिकारी धारबा नाईक यांनी सदाशिव चंद्रवंशी या त्यांच्या मुलाला दिली होती. परंतु सोमवारी रात्री शेतकरी शंकरराव चंद्रवंशी यांचा मृत्यू झाला. हा राग मनात धरून त्यांचा मुलगा सदाशिव चंद्रवंशी व इतर दोघांनी रुग्णालयामध्ये वैद्यकीय अधिकारी धारबा नाईक यांना शिवीगाळ करत कॉलर धरले. हा प्रकार एवढ्यावरच न थांबता रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. अखेर वैद्यकीय अधिकारी नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हदगाव पोलीस ठाण्यात सोमवारी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Mayata's son vandalizes Hadgaon sub-district hospital