शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

२६ मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:09 PM

नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

ठळक मुद्देनांदेड लोकसभा मतदारसंघ १७ लाख ९९१ मतदार बजावणार हक्क

नांदेड : नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी १९ मार्च रोजी अधिसूचना निघणार असून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील तर २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. तर १८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. १७ लाख ९९१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अरुण डोंगरे यांनी ११ मार्च रोजी पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात नांदेडसह हिंगोली , लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांचाही समावेश आहे. हिंगोली मतदारसंघात किनवट आणि हदगाव विधानसभा मतदारसंघ तर लातूर लोकसभा मतदारसंघात लोहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी १९ मार्चपासून २६ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. २७ मार्च रोजी अर्जाची छाननी तर २९ मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. या निवडणुकीत ७० लाखांची निवडणूक खर्चाची मर्यादा आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना २५ हजार रुपये सर्वसाधारण गटातील उमेदवाराला तर अनुसूचित जाती, जमातीच्या उमेदवारास १२ हजार ५०० रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे.जिल्ह्यात या तिन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतदान केंद्राची संख्या पाहता २ हजार ९५५ मतदान केंद्र जिल्ह्यात तर नांदेड लोकसभेसाठी १ हजार ९९६ मतदान केंद्र राहणार आहेत. नांदेड लोकसभेसाठी असणाऱ्या १७ लाख ९९१ मतदारांमध्ये ८ लाख ८३ हजार १३८ पुरुष मतदार तर ८ लाख १७ हजार ७९५ महिला मतदारांचा समावेश आहे. इतर मतदार ५८ आहेत. जिल्ह्यातील मतदान केंद्राचे २७१ विभाग करण्यात आले . मतदान प्रक्रियेसाठी २५१ बस निवडणूक विभागाला आवश्यक राहणार आहेत तर ३ दिवसांसाठी २५१ खाजगी वाहनेही लागणार आहेत. निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांसाठी १३४ वाहने एका महिन्यासाठी घेतली जाणार आहेत. निवडणूक अधिकारी, सहायक निवडणूक अधिकारी, निरीक्षक यांच्यासाठी १४ वाहने घेतली जाणार आहेत. या सर्व प्रक्रियेसाठी ४०० जीपही निवडणूक विभागाला आवश्यक राहणार आहेत.मतदान प्रक्रियेसाठी बॅलेट युनिट ६ हजार ६९८, कंट्रोल युनिट ३ हजार ८१६ आणि व्हीव्हीपॅट यंत्राची संख्या ४ हजार १२५ आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यात असलेल्या २ हजार ९५५ मतदान केंद्रांसह ३६ सहायक मतदान केंद्रही स्थापन करण्यात आले आहेत. मतदान नोंदी प्रक्रियेत आजघडीला नाव वगळणी, सुधारणा या बाबी पूर्णपणे थांबविण्यात असल्या तरी नाव नोंदणीची प्रक्रिया सुरु असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. त्यामुळे वाढीव सहायक मतदान केंद्र हे वेळप्रसंगी उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.नांदेड जिल्ह्याला कर्नाटक आणि तेलंगणाच्या सीमा लागून आहेत. त्यात तेलंगणाचे चार जिल्हे तर कर्नाटकचा एक जिल्हा आहे. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने १५ आंतरजिल्हा चेकपोस्ट स्थापन करण्यात आले आहेत. यामध्ये किनवट मतदारसंघात गणपूरफाटा, गोंडजेवाडी, मार्लागुंडा, मिनकीफाटा, हदगाव मतदारसंघात वाशी, भोकर मतदारसंघात राहटी, पाळज, नायगाव मतदारसंघात बासररोड, बेल्लूर आणि देगलूर मतदारसंघात नागणी, कार्लाफाटा, आरटीओ चेकपोस्ट, सांगवी उमर, शेकापूर, भुतान हिप्परगा व हणेगाव या ठिकाणी अंतरराज्य चेकपोस्ट राहणार आहेत.निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने विविध विभागांची स्थापना करण्यात आली असून या विभागावर नोडल आॅफिसरच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर, बंदोबस्त नियुक्ती गृह उपअधीक्षक मोरे, प्रशिक्षण व्यवस्थापन अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, माहिती व्यवस्थापन उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके, ईव्हीएम आणि पोस्टल मतदान पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, निवडणूक खर्च विभाग जिल्हा कोषागार अधिकारी मनोज गग्गड, सोशल मीडिया विभाग स्वारातीम विद्यापीठाचे डॉ. दीपक शिंदे, मदत आणि तक्रार विभाग उपायुक्त गीता ठाकरे, निरीक्षक विभाग राम गगराणी, वाहतूक व्यवस्था व कर्मचारी व्यवस्थापन तहसीलदार पांगरकर, संगणक कक्ष कर्णेवार, टोल फ्री विभाग प्रिया जांभळे, स्वीप विभाग शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, आॅनलाईन अ‍ॅप प्रदीप डुमणे आणि मतदान साहित्य व्यवस्थापन सहायक जिल्हा नियोजन अधिकारी जी. बी. सुपेकर यांचा समावेश आहे....तर अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल होतीलजिल्ह्याला असलेल्या तेलंगणा व कर्नाटक या राज्यांच्या सीमा लक्षात घेवून सीमेवरील जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या उपस्थितीत ११ मार्च रोजी नांदेडमध्ये बैठक झाली. या बैठकीत सुरक्षा व्यवस्थांचा आढावा घेण्यात आला. त्याचवेळी केंद्रेकर यांनी निवडणूक विभागाशी संबंधित अधिका-यांचीही बैठक घेतली. या बैठकीत आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन झाले पाहिजे हे स्पष्ट केले. ज्या ठिकाणी आचारसंहितेचे उल्लंघन झाले त्या ठिकाणी अधिकारी-कर्मचाºयांची हलगर्जीपणा आढळल्यास त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्यात येतील असेही त्यांनी बैठकीत स्पष्ट केले.

टॅग्स :NandedनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९