शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील 'मातोश्री' पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:20 IST

आजची शिवसेना ही क्षीण झाली आहे

ठळक मुद्देशिवसेनेसोबत सत्ता स्थापनेसाठी भाजपा आजही तयार सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर

नांदेड : शिवेसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना ही देश हिताची होती. आजची शिवसेना ही क्षीण झाली असून मुंबई येथील 'मातोश्री'पेक्षा दिल्लीतील 'मातोश्री' अधिक शक्तिशाली झाल्याचा टोमना माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मारला.

नांदेड येथे बुधवारी एका खाजगी कार्यक्रमासाठी आल्यानंतर मुनगंटीवार हे पत्रकारांशी बोलत होते. सध्याचे महाराष्ट्रातील सरकार हे व्हेंटीलेटरवर आहे. त्यामुळे ते फार काळ टिकणार नाही. २५ आॅक्टोबर १९५१ पासूनचा इतिहास पाहिला असता. देशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कोणत्याही निवडणुकीतील भिन्न विचारसरणीची कोणतीही सत्ता सलग पाच वर्ष टिकली नसल्याचा हवाला देत सध्याचे सरकार किती दिवस टिकेल हे कोणालाही सांगता येत नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले. काँग्रेसनेते अशोक चव्हाण यांनी नुकतेच जे विधान केले ते मात्र अगदी खरे आहे. हे सरकार मुस्लिम समाजाच्या आग्रही मागणीमुळे भाजपाला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेशी युती करुन स्थापन झाले आहे. या सरकारला शेतकरी, बेरोजगार, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नाबाबत काहीही देणे घेणे नसल्याची टिकाही त्यांनी यावेळी केली.

शिवसेनेचा प्रस्ताव आल्यास आजही सत्ता स्थापन करू शिवसेना आमचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे ‘सुबह का भुला शाम को घर आये तो उसे भुला नही कहते’. असे सांगत शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर सरकार स्थापनेसाठी आम्ही तयार असल्याचे प्रतिपादन माजी अर्थमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी केले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाcongressकाँग्रेसNandedनांदेड