विवाहितेचा मृत्यू, आठ जणांवर गुन्हा

By Admin | Updated: February 3, 2015 17:12 IST2015-02-03T17:12:45+5:302015-02-03T17:12:45+5:30

मुक्रमाबाद हद्दीतील मौजे सन्मुखवाडी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली.

Marriage death, crime against eight | विवाहितेचा मृत्यू, आठ जणांवर गुन्हा

विवाहितेचा मृत्यू, आठ जणांवर गुन्हा

 नांदेड : मुक्रमाबाद हद्दीतील मौजे सन्मुखवाडी येथे सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेचा मृत्यू झाल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली.
व्यंकट सीताराम राठोड रा. कृष्णवाडी ता. मुखेड यांची बहीण मीराबाई सुधाकर चव्हाण यांचा लग्न झाल्यापासून पैशासाठी सासरच्या मंडळीकडून छळ सुरु होता. या छळाला कंटाळूनच तिचा मृत्यू झाला असून या मृत्यूला सासरची मंडळी कारणीभूत असल्याची तक्रार व्यंकट राठोड यांनी दिली. त्यानुसार मुक्रमाबाद पोलिसांनी भिमराव गोविंद चव्हाण, सुधाकर गोविंद चव्हाण, नामदेव परशुराम राठोड, सविता भीमराव चव्हाण, शिवाजी परसराम राठोड, शिवाजी मारोती चव्हाण, धनाजी गोविंद चव्हाण, शेषराव गोविंद चव्हाण यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. 
सारखणी फाटा येथे चोरी
सिंदखेड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सारखणी फाटा येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान फोडून चोरट्यांनी १९ हजारांचा माल लंपास केल्याची घटना ३१ जानेवारी रोजी घडली.
इम्तियाज उस्मान फाजलाणी यांचे सारखणी फाटा येथील दुकान चोरट्यांनी टिनपत्रे कापून फोडले. एक एलसीडी व मोबाईल असा एकूण १९ हजारांचा माल चोरट्यांनी लंपास केला. याप्रकरणी सिंदखेड पोलिसांनी गुन्हा नोंदविला. /(प्रतिनिधी)

Web Title: Marriage death, crime against eight