दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:23 IST2021-02-27T04:23:58+5:302021-02-27T04:23:58+5:30

घरासमोरील सायकल चोरट्याने लांबविली नांदेड : शहरातील जनार्धननगर भागात घरासमोर उभी केलेली सायकल चोरट्याने लंपास केली. ही घटना २४ ...

Marital harassment for ten lakhs | दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

दहा लाखांसाठी विवाहितेचा छळ

घरासमोरील सायकल चोरट्याने लांबविली

नांदेड : शहरातील जनार्धननगर भागात घरासमोर उभी केलेली सायकल चोरट्याने लंपास केली. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी घडली. भीमराव जयसिंग राठोड यांनी रोड मास्टर कंपनीची नऊ हजार रुपयांची सायकल घराबाहेर उभी केली होती. ही सायकल लंपास करण्यात आली. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

कार घेण्यासाठी विवाहितेचा छळ

नांदेड : कार घेण्यासाठी माहेराहून तीन लाख रुपये घेऊन येण्याची मागणी करीत विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना माहूर तालुक्यातील तांदळा येथे घडली. पीडितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करण्यात आली. या प्रकरणात अष्टदीप नीळकंठ जाधव, विनाबाई जाधव, नीळकंठ जाधव, आकाश जाधव यांच्या विरोधात माहूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Marital harassment for ten lakhs