शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सुखद ! घरीच उपचार घेवून अनेकजण करताहेत कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 18:25 IST

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार १९९

ठळक मुद्देबुधवारी ५१ बाधित आढळले६५ वर्षीय महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू

नांदेड- बुधवारी सायंकाळी कोरोना तपासणीचे ९२६ अहवाल प्राप्त झाले. यातील ८७१ अहवाल निगेटिव्ह आले तर ५१ नवे बाधित निष्पन्न झाल्याने जिल्ह्यातील एकुण कोरोना रुग्णांची संख्या १९ हजार ३३७ एवढी झाली आहे. दरम्यान मागील २४ तासात कोरोनाने शहरातील यशवंतनगर येथील एका ६५ वर्षीय महिलेचा बळी घेतल्याने बाधित मृत रुग्णांची संख्या ५१९ वर गेली आहे. विशेष म्हणजे उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के एवढे झाले आहे.

बुधवारी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात ३१ बाधित आढळून आले.तर ॲन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात १२, हदगाव १, लातूर येथील ३ तर नांदेडग्रामीण आणि अर्धापूर येथील प्रत्येकी २ रुग्ण आढळून आले. बुधवारी जिल्हा रुग्णालयातील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या नांदेड शहरातील यशवंतनगर येथील ६५ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. सध्या जिल्ह्यातील विविध कोविडकेअर सेंटरमध्ये ४५३ जणांवर उपचार सुरु आहेत.यामध्ये विष्णुपूरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ७५, जिल्हा रुग्णालय ३३, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत ४१, मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण १४०, मुखेड ४, किनवट २४, देगलूर १०, हदगाव ७, लोहा ७, बिलोली २१, भोकर १२, अर्धापूर १५, बारड १, धर्माबाद १, हिमायतनगर ३, कंधार ४, मांडवी १, मुदखेड २ तर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात ५२ जणांवर उपचार सुरु आहेत. यातील ३४ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे जिल्हा रुग्णालयाच्यावतीने सांगण्यात आले.

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १८ हजार १९९जिल्हयातील बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे.विशेष म्हणजे बाधित रुग्ण घरीच बरे होण्याचे प्रमाण ९४.११ टक्के इतके आहे. बुधवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथील १९, एनआरआय भवन व गृहविलगीकरणातील १६, हदगाव येथील १, मुखेड येथील ३, जिल्हा रुग्णालयातील ५, नायगाव तालुक्यतील गृहविलगीकरणातील ७, बिलोली कोविड सेंटरमधील २ आणि खाजगी रुग्णालयातील ६ जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNandedनांदेड