कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांना मृत्यूने गाठले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:19 IST2021-07-28T04:19:21+5:302021-07-28T04:19:21+5:30
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात प्रशासनास आले होते. परंतु, दुसऱ्या लाटेत नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने ...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच अनेकांना मृत्यूने गाठले
नांदेड जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत संसर्ग रोखण्यात प्रशासनास आले होते. परंतु, दुसऱ्या लाटेत नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. या काळात रुग्णांना ऑक्सिजन बेडसह साधे बेड मिळविण्यासाठीही धावपळ झाली. परंतु, प्रशासनाने प्रत्येकाला बेड उपलब्ध होईल अशी व्यवस्था केली होती. त्यात खासगी रुग्णालयांकडून होणारी आर्थिक लूट थांबविण्यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष पथक स्थापन करून रुग्णालयाचे ऑडिटही करण्यात आले होते. तर काही रुग्णांना रुग्णालयांना जास्तीचे पैसे परत करण्याचेही आदेश देण्यात आले. दरम्यान, तिसरी लाट लक्षात घेऊन भक्ती लाॅन्स येथे दोनशे बेडचे जम्बो कोविड केअर सेंटर उभारले होते; परंतु कोरोना रुग्णसंख्या घटल्याने या कोविड सेंटरचा उपयोग होऊ शकला नाही.
प्रशासनाची तयारी...
कोरोनाकाळात प्रत्येक रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे यासाठी आपण नियोजन केले होते. येणारी संभाव्य तिसरी लाट लक्षात घेऊन आरोग्य विभागाने संपूर्ण तयारी केलेली आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही, हे नियोजनामुळे शक्य झाले. संभाव्य लाट लक्षात घेऊन आपली तयारी आहे. - डाॅ. नीळकंठ भोसीकर,
जिल्हा शल्य चिकित्सक, नांदेड
अंगावर आजार काढणे पडले महागात
कोरोनाची लक्षणे असूनही आपल्याला काही होणार नाही, असा अतिविश्वास नडला. त्यातूनच वडिलांना जीव गमवावा लागला. ताप आल्याने घरीच उपचार सुरू केले. कोणत्याही डाॅक्टरकडे दाखविले नाही. त्यातच कोरोनाने संपूर्ण फुप्फुसांमध्ये शिरकाव केला. सीटी स्कॅन केले असता स्कोअर २१ आला. आठ दिवस उपचार करूनही शरीराने प्रतिसाद न दिल्याने मृत्यू झाला. जर ताप आली तेव्हाच तपासणी केली असती तर ही वेळ आली नसली. - भारत हटकर
महिलेचा मृत्यू
हदगाव तालुक्यातील एका महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.या महिलेचे वय ३२ वर्षे होते.
या महिलेला रात्रीच्या सुमारास एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु सीटी स्कॅन होईपर्यंत मृत्यू झाला.