शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
3
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
4
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
5
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
6
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
7
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
8
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
9
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
10
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
11
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
12
गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
13
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
14
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
15
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
16
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
17
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
18
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात
19
दिल्ली विमानतळाच्या एटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; १०० हून अधिक विमानफेऱ्या रखडल्या, विलंबाने 
20
Infosys Buyback 2025: २२ टक्के प्रीमिअमवर शेअर पुन्हा खरेदी करणार इन्फोसिस; रेकॉर्ड डेट निश्चित, कोणाला होणार फायदा?

नांदेडातून कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:17 IST

येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष रणनिती आखणार आहे.

ठळक मुद्देरावसाहेब दानवेंची गुगलीनिवडणुकीसाठी नांदेड, हिंगोलीमध्ये विशेष रणनिती आखणार

नांदेड : मागील लोकसभा निवडणुकीत नांदेड आणि हिंगोली लोकसभा मतदारसंघात भाजपा अपयशी ठरला. मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे दोन्ही मतदारसंघ जिंकण्यासाठी पक्षाच्या वतीने विशेष रणनिती आखणार आहे. विशेषत: नांदेडमध्ये भाजपचे कमळ हाती घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असल्याची गुगली टाकत भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधी पक्षाबरोबरच भाजपातील इच्छुकांनाही सूचक इशारा दिला.पक्षबांधणी तसेच निवडणूकपूर्व आढावा घेण्यासाठी जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाºयांची सोमवारी येथील शासकीय विश्रामगृहात बैठक पार पडली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. २८८ विधानसभा मतदारसंघात जाऊन निवडणूक तयारीचा आढावा घेत आहे. विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, ठाणे, कल्याणनंतर आता मराठवाड्याचा दौरा करीत असून दुस-या टप्प्यात इतर जिल्ह्यांत जावून कार्यकर्त्यांकडून निवडणूक तयारीची माहिती घेणार आहे. नांदेड जिल्ह्यात पूर्वीच्या तुलनेत पक्षाचे काम वाढले आहे. अशीच परिस्थिती इतर जिल्ह्यातही असल्याचे सांगत थेट मतदारांपर्यंत जाण्यासाठी कार्यकर्ते, पदाधिका-यांनी बाहेर पडावे, अशा सूचना दिल्याचे ते म्हणाले.आगामी निवडणुका शिवसेनेसह समविचारी पक्षांना सोबत घेवून लढण्याचा मानस आहे. शिवसेनेने आता मंदिर उभारण्याची हाक दिली आहे. राम मंदिराच्या मुद्यावर शिवेसना कालही आमच्यासोबत होती आणि आजही आमच्याबरोबरच असल्याचे सांगत प्रत्येकाला आपला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे सेना-भाजपात काही ठिकाणी संघर्ष होत असला तरी आम्ही एकत्रच असल्याचे सांगत मागील निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले होते. येणा-या निवडणुकीतही पाच-सहा जागा वगळता राज्यभरात जनता भाजपच्याच पाठीशी उभी असल्याचे पुन्हा दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्याबाबत प्राधान्याने विचार करणार असल्याचेही ते म्हणाले.बैठकीला संघटनमंत्री विजय पुराणिक, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव खतगावकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, आ. तुषार राठोड, आ. राम पाटील रातोळीकर, डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर, संतुक हंबर्डे, ओमप्रकाश पोकर्णा, माजी आ. गंगाराम ठक्करवाड, बालाजी शिंदे, चैतन्य देशमुख, प्रवीण साले, व्यंकटेश साठे, श्रावण पाटील भिलवंडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.दानवे यांच्या परीक्षेत पदाधिकारी नापासआढावा बैठकीत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मतदारसंघनिहाय आढावा घेतला. यावेळी अनेक पदाधिकाºयांच्या कामावर दानवे हे नाराज दिसून आले. बुथवाईज कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारले गेले नाही, पक्षाच्या विविध आघाड्या, सेलच्या नियुक्त्या अद्यापही झालेल्या नसल्याचे पुढे आल्यानंतर आमदारांसह पदाधिकाºयांचा त्यांनी समाचार घेतला़जिल्ह्यातील नायगावसह ज्या मतदारसंघात ताकद आहे किमान तिथे तरी जोर लावा, अशा शब्दात त्यांनी पदाधिकाºयांना सुनावले. नांदेड शहरातील दक्षिण आणि उत्तर या दोन्ही मतदारसंघात अपेक्षित काम झाले नसल्याबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. बैठकीनंतर पत्रकार परिषदेत मात्र दानवे यांनी नांदेडमध्ये उत्तम काम सुरू असल्याचा दावा केला.शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवामागील चार वर्षांत कर्जमाफी, आवास योजनासह गॅस, मीटर, कृषी, ठिबक आदी विविध योजनांच्या माध्यमातून सरकारने लाखो नागरिकांना विविध लाभ दिलेले आहेत. या प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत भाजपा पदाधिकारी पोहोचला पाहिजे, असे सांगत थेट घरोघरी जावून पक्षाच्या ध्येय-धोरणाबरोबर सरकारच्या कामाची माहिती द्या, असे आदेश प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पदाधिकाºयांना दिले. नांदेड जिल्ह्यातील कामाबाबत मी समाधानी नाही, आगामी काळात पुन्हा नांदेडला येवून कामाचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Nandedनांदेडraosaheb danveरावसाहेब दानवेBJPभाजपाparabhaniपरभणीHingoliहिंगोली