शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता करा अन्यथा आत्मदहन ; किनवट तालुक्यातील घोगरवाडीकरांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 20:03 IST

स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत.

ठळक मुद्देकिनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़

- गोकुळ भवरे

किनवट (नांदेड ) : स्वातंत्र्याची ७१ वर्षे उलटली तरीही शक्तनगर (घोगरवाडी) ची वस्ती रस्त्याअभावी मुख्य प्रवाहाला जोडली नसल्याने नागरिकांना मरणयातना सहन कराव्या लागत आहेत. रस्ता मंजूर करुन काम सुरु करा, अन्यथा महाराष्ट्रदिनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा ६५ जणांनी निवेदनाद्वारे दिला आहे. 

किनवटपासून १२ कि.मी. अंतरावर अतिदुर्गम डोंगरमाथ्यावर निजामकालीन शक्तीनगर (घोगरवाडी) वस्ती आहे़ येथे आदिम कोलाम जमातीसह आदिवासीत मोडणारी गोंड जातीची वस्ती आहे़ या गावाची नोंद निजाम शासनदरबारी असूनही ही वस्ती स्वातंत्र्याच्या ७१ वर्षांनंतरही रस्त्याअभावी मुख्य प्रवाहात आली नाही़ रस्ताच नसल्याने या वस्तीत कोणतेच वाहन जात नाही़ तालुक्याच्या ठिकाणी यायचे झाल्यास येथील जनतेला पायपीट करून व प्रसंगी बैलगाडीने ये-जा करावी लागते़  

शक्तीनगर येथील इंदू धुर्वे या महिलेला २६ जुलै २०१७ रोजी रात्री प्रसववेदना सुरू झाल्या़ कोणतेच वाहन नसल्याने २७ जुलै रोजी दोन कि़मी़ अंतर बैलगाडीने प्रवास करून त्यानंतर सकाळी ७ वाजता रुग्णवाहिकेत टाकून तिला उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे नेण्यात आले़ तशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने २८ जुलै २०१७ च्या अंकात ‘रस्ताच नसल्याने गर्भवतीचा २ कि़मी़ बैलगाडीने प्रवास’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते़वन अधिनियम हा १९२७ चा आहे़ मात्र आदिवासी गावे त्या अगोदर शंभर वर्षे पूर्वीची आहेत़ मग वन जमिनीवर अतिक्रमण कसे? वनविभागाचा हस्तक्षेप का? असा सवाल संतप्त ग्रामस्थांनी विचारला. वनविभागाचे केवळ भूत दाखवून रस्त्यापासून कोसोदूर ठेवण्याचा हा सरकारी यंत्रणेचा कुटिल डाव असल्याचा आरोपही होत  आहे़ म्हणून जगण्यापेक्षा आम्हाला मरणच सोपे वाटते, अशी व्यथित प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते दत्ता आडे व नीळकंठ कातले यांनी दिली़ 

रस्त्यासाठी तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकार्‍यांचे प्रयत्नहा रस्ता व्हावा म्हणून तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ़अभिजित चौधरी, डॉ़राजेंद्र भारूड यांनी आदिम जाती सुधार योजनेअंतर्गत अंदाजपत्रकही प्रकल्प अधिकारी या नात्याने पाठविले होते़ पुढे ते लालफितीतच अडकले.  वनजमिनीतून रस्ता जात असल्याने या रस्त्यांना वनविभाग अडसर ठरत आहे़ आजही भीमपूर, पितांबरवाडी, अंबाडीतांडा, वरगुडा, वडोली-वसवाडी, प्रेमनगर, पाटोदा-पोतरेड्डी, रामपूर, जलधरा, मांजरी माथा, वागदरी, जवरला ते पळशीडाग, जवरला ते किनवट-पिंपरशेंडा आदी रस्ते रखडले आहेत. रस्त्याची मागणी घेवून घोगरवाडीच्या सरपंच अनुसया पेंदोर, संगीता उईके, दत्ता वेट्टी, भीमराव शेडमाके, भीमराव सलाम, सूर्यभान आत्राम व इतर ५९ जणांनी रस्ता न झाल्यास सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला आहे.