महावीर जयंती साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:18+5:302021-04-27T04:18:18+5:30

औषधी, गोळ्या वाटप हदगाव - तामसा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनसळे यांनी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पाच हजार ...

Mahavir Jayanti celebration | महावीर जयंती साजरी

महावीर जयंती साजरी

औषधी, गोळ्या वाटप

हदगाव - तामसा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन सोनसळे यांनी तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांसाठी पाच हजार पॅरासिटेमॉल गोळ्या, सॅनिटायझर व २०० मास्क वाटप केले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक कदम, सपोनि अशोक उजगरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोदरवाड, सहाय्यक अभियंता साखरे, संजय राऊलवार, माधव नारेवाड, श्रीमती बनसोडे, सतीश छत्रे आदी यावेळी उपस्थित होते.

रोहित तोंदले यांची नांदेडला बदली

नांदेड - सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेडचे उपकार्यकारी अभियंता म्हणून कोल्हापूर विभागात कार्यरत रोहित तोंदले यांची बदली करण्यात आली. तोंदले यांनी लगेच कार्यभार स्वीकारावा असे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

सहविचार सभा

किनवट - पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीची सहविचार सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. सभेत विविध प्रकारचे १४ ठराव मंजूर करण्यात आले. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते. सभेचे संचलन हरीश ससनकर यांनी केले. राज्य पदाधिकारी आर.जी.मानारकर, व्ही.एस.घाटे, विजय भोगेकर, अलका ठाकरे, बालाजी पांडागळे, जी.एस. मंगनाळे आदी यावेळी उपस्थित होते.

अतिक्रमण हटाव मोहीम

लोहा - तालुक्यातील सोनखेड येथे राष्ट्रीय महामार्गालगत ५० फुटापर्यंत अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली. अतिक्रमणामुळे नाल्या बंद अवस्थेत आहेत. नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात जाते. ग्रामपंचायत प्रशासनाने या सदंर्भात तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला सहा महिन्यांनी मुहूर्त मिळाला आणि अतिक्रमण हटविणे सुरू झाले.

बालकाचा अपघाती मृत्यू

लोहा - तालुक्यातील सोनखेडपासून दोन किमी. अंतरावर हरबळ येथे पाठीमागून वाहनाचा धक्का लागल्याने १३ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना २४ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता घडली. गणेश तुकाराम शिंदे असे मयताचे नाव आहे. घटनेत तो जागीच गतप्राण झाला. हरबळ येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

निर्जंतुकीकरण फवारणी

लोहा - तालुक्यातील टाकळगाव ग्रामपंचायतीच्या वतीने गावात सोडियम हायप्रोफाईल फ्लोराईडची तपासणी करण्यात आली. सरपंच भीमराव लामदाडे, उपसरपंच संभाजी चिंतोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकरराव मोरे ग्रामविकास अधिकारी अमृत शिंदे आदींनी याकामी पुढाकार घेतला. ग्रामस्थांनी कोरोनाचे नियम पाळावेत असे आवाहन पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

किवळा येथे पाच दिवस जनता संचारबंदी

लोहा - तालुक्यातील किवळा येथे २६ ते ३० एप्रिल दरम्यान जनता संचारबंदी पाळण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला. वारंवार कळवूनही नागरिक रस्त्यावर फिरत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. गावातील व्यावसायिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवावीत असे आवाहन सरपंच सुमित्रा पाटील ढगे, उपसरपंच केशव पाटील, ग्रामविकास अधिकारी अमृतराव पाटील, माजी सरपंच साईनाथ पाटील टरके, शंकर ढगे, रत्नाकर सर्जे आदींनी केले आहे.

प्रतिनियुक्ती रद्दची मागणी

किनवट - तालुक्यातील कोठारी (मांंडवी) प्रा. आ. केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव राठोड यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याची मागणी नागरिकांनी केली. केंद्रातील चारपैकी दोन वैद्यकीय अधिकारी कोरोना बाधित आहेत. एक जण प्रतिनियुक्तीवर व दुसरे भिलगाव येथे नियुक्तीवर असून मांडवी येथे ते राहतात. वेळेवर वैद्यकीय अधिकारी मिळत नसल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

वृक्षारोपण व जनजागृती

नांदेड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त ॲड. रामराव मल्हारे व मित्रमंडळाच्या वतीने २५ एप्रिल रोजी बोरगाव किवळा येथे १३० वृक्षारोपण व कोरोना रोखण्यासाठी उपाय करण्यासाठी १३० ठिकाणी पोस्टर लावण्यात आले. यावेळी एकनाथराव पवळे, साहेबराव पवळे, शेषाबाई पवळे, लक्ष्मीबाई मल्हारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे प्रमुख ॲड. रामराव मल्हारे, राहुल पवळे, आनंदा पवळे यांनी परिश्रम घेतले.

भंगार दुकानाला आग

मुदखेड - मुदखेड येथील शेख अजीम शेख अजगर यांच्या भंगार दुकानाला आग लागून १ लाख ५० हजारांचे नुकसान झाले. तसेच २ लाख रुपयांचे लोखंडी शेड जळाले. वेळेवर अग्निशमन दल व पाण्याची व्यवस्था न झाल्याने नुकसानीचा फटका शेख अजीम यांना बसला. अग्निशमन दलाच्या इमारतीचे बांधकाम झाले मात्र प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही असा आरोप केला जात आहे.

शेळगाव गौरीला लसीकरण

नायगाव - तालुक्यातील शेळगाव गौरी येथे ५५० चे उद्दिष्ट असताना ५७० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. सरपंच मनोहर तोटरे, पं.स. उपसभापती संजय पाटील, उत्तमराव पाटील, डॉ. बोरकर, डॉ. बालन शेख, डॉ. जावेद, तलाठी विजय जाधव, ग्रामसेवक धनराज केते, आरोग्य कर्मचारी चव्हाण, ज्योती ढवळे, उपसरपंच शालिनी पाटील, सुमित्रा पाटील, केशव पाटील, शालिनी वाघमारे आदींनी याकामी पाठपुरावा केला.

Web Title: Mahavir Jayanti celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.