सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले

By शिवराज बिचेवार | Updated: August 12, 2022 12:02 IST2022-08-12T12:01:18+5:302022-08-12T12:02:40+5:30

अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीची गरज असल्याचे केले स्पष्ट

Mahavikas Aghadi is the only option to make the government fall, Ambadas Danve said clearly | सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले

सरकारला सळो की पळो करण्यासाठी महाविकास आघाडीच पर्याय, दानवे यांनी स्पष्टच सांगितले

नांदेड: राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारला सळो की पळो करून सोडायच असेल आणि आव्हान द्यायचं असेल तर महाविकास आघाडीच सक्षम आहे अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त दिली.

नांदेड जिल्ह्यातील पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी  शुक्रवारी ते नांदेडमध्ये आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या महाविकास आघाडीच्या वक्तव्यावर दानवे यांना विचारले असता त्यांनी हा विषय जुना झाला असे म्हणून प्रश्नाला बगल दिली. तसेच अप्रत्यक्षपणे महाविकास आघाडीची गरज असल्याचे स्पष्ट केले. 

Web Title: Mahavikas Aghadi is the only option to make the government fall, Ambadas Danve said clearly