उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला -खा. चिखलीकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:47+5:302021-05-17T04:15:47+5:30
-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर राज्याने हरहुन्नरी नेता गमाविला खा. सातव यांच्या निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. ...

उमद्या नेतृत्वाला महाराष्ट्र मुकला -खा. चिखलीकर
-खा. प्रतापराव पाटील चिखलीकर
राज्याने हरहुन्नरी नेता गमाविला
खा. सातव यांच्या निधनाने संपूर्ण राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या अकाली जाण्याने एक पोकळी निर्माण झाली आहे. राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसले आहे. मागील २३ दिवसांपासून त्यांच्यावर कोरोना रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाचा रिपाेर्ट निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना न्यूमोनियाचा संसर्ग झाला. उच्चशिक्षित साधी राहणीमान आणि अभ्यासूवृत्ती अशी खा. राजीव सातव यांची ओळख. अत्यंत सालस, अत्यंत राजस, राजबिंडा आणि ऐतिकासिक परंपरा लाभलेल्या एका राजकीय पक्षाचा नेता अशा महामारीत जाणे क्लेशदायक आहे. राजीव सातव यांच्या रूपाने युवा पिढीचा दिशादर्शक हरविला आहे. अभ्यासू, कर्तबगार आणि तितकाच लोकाभिमुख विचार करणारा पारदर्शक नेता म्हणून जनता त्यांच्याकडे आदराने पाहत होती.
-आ. अमरनाथ राजूरकर