शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

किनवटमध्ये परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 20:24 IST

भाजपाचे भीमराव केराम सहाव्यांदा रिंगणात

ठळक मुद्दे१५ उमेदवार रिंगणात वंचित बहुजन आघाडीची भूमिकाही महत्त्वपूर्ण

- गोकुळ भवरे

किनवट मतदारसंघात पुन्हा एकदा परंपरागत प्रतिस्पर्धी आमने-सामने आले आहेत. यावेळी वंचित बहुजन आघाडी आणि मनसेही रिंगणात उतरले असून या चौरंगी लढतीत प्रदीप नाईक पुन्हा विजयाचा चौकार लगावणार की भीमराव केराम हे त्यांचा विजयरथ रोखतील, याकडे लक्ष लागले आहे.किनवट मतदारसंघ प्रामुख्याने आदिवासी बंजारा बहुल आहे. माजी मंत्री डी.बी. पाटील यांचा अपवाद वगळता येथे आदिवासी आणि बंजारा समाजाने या मतदारसंघाचे नेतृत्व केले आहे. गेल्या तीन निवडणुकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने येथे विजय मिळवत या मतदारसंघाला राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख मिळवून दिली आहे. प्रदीप नाईक यांनी मागील १५ वर्षाच्या काळात केलेल्या विकास कामाच्या जोरावर पुन्हा रिंगणात उतरले आहेत. मितभाषी असलेले आ. नाईक हे बंजारासह इतर समाजातही संपर्क ठेवून आहेत.

दुसरीकडे माजी आ. भीमराव केराम हेही सहाव्यांदा विधानसभेच्या निवडणुकीत उतरले आहेत. मागील निवडणुकीत अपक्ष म्हणून केराम यांनी कडवी झुंज दिली होती. यावेळी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली आहे. केराम यांच्यासाठी ही बाब जमेची ठरणार आहे. काँग्रेस, सेना, भाजपा, भारिप-बहुजन महासंघ अशा विविध पक्षांचा प्रवास करुन आलेल्या केरामांना मतदार कितपत स्वीकारतात? हेही आगामी काळात स्पष्ट होणार आहे. १९९३ च्या पोटनिवडणुकीत भारिप-बहुजन महासंघाकडून केराम यांनी या मतदारसंघात विजय मिळवला होता. वंचित बहुजन आघाडीही रिंगणात उतरली असून डॉ. हमराज उईके यांना रिंगणात उतरविले आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रवक्ते म्हणून काम करणारी उईके हे आपल्या विधानसभा मतदारसंघात कितपत प्रभाव पाडू शकतील, हेही तितकेच महत्वाचे आहे. मनसेचे उमेदवार विनोद राठोड यांच्यासह अपक्ष उमेदवार किती मतविभाजन करणार? यावरही मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- पैनगंगा नदीवर प्रलंबित असलेल्या उनकेश्वर, मारेगाव, किनवट या उच्च पातळी बंधाऱ्याची मतदारसंघाला गरज आहे. सिंचनाचे क्षेत्र वाढविण्यासाठी साठवण तलाव, पाझर तलावांची गरज आहे. या मतदारसंघात जवळपास २० प्रकल्प प्रलंबित आहेत. ते पूर्ण करणे गरजेचे आहे.मतदारसंघातील रस्ते सिंचनाच्या कामाला युती सरकारच्या काळात ब्रेक बसल्याचा आरोप आहे. पुन्हा एकदा या कामांना मार्गी लावणे गरजेचे आहे. रस्ते, सिंचन, पाणी पुरवठा योजनांची कामे आवश्यक आहेत.- किनवट मतदारसंघातील किनवट व माहूर तालुक्यातील १२९ गावचा पाणीपुरवठा, नळयोजनांची कामे मंजूर असली तरीही ही कामे प्रलंबितच आहेत. दुसरीकडे गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात ५० वरुन १०० खाटांची क्षमता करण्याची गरज आहे. त्याचवेळी जंगल क्षेत्राच्या संरक्षणासाठी किनवट येथे उपवनसंरक्षक कार्यालय गरजेचे आहे

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूप्रदीप नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस)- सलग तीन वेळा आमदार राहिलेले     प्रदीप नाईक हे संयमी मितभाषी म्हणून परिचित आहेत. - समाजकारण, राजकारण आणि विकास कामांचा दृढ संकल्प करणारे नेतृत्व- राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत. शरद पवार यांचे कट्टर समर्थक

भीमराव केराम (भाजपा)- आदिवासी मतदारसंघाच्या माध्यमातून नेहमीच सामाजिक कार्य व आंदोलनात सक्रिय- भारिप-बहुजन महासंघ, काँग्रेस, शिवसेना, भाजप असा सर्वच राजकीय पक्षांचा प्रवास पूर्ण- स्थानिकांशी दांडगा जनसंपर्क. तसेच सामान्यांशी जुळलेली नाळ 

डॉ. हेमराज उईके(वंचित आघाडी)- पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात, यापूर्वी मांडवी गटातून जि.प. निवडणूक लढवण्याचा अनुभव- लोकसभा निवडणुकीत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते म्हणून कार्य केले- बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव. सामान्य जनतेत चांगली प्रतिमा.

विनोद राठोड (मनसे)- माजी खा. उत्तमराव राठोड यांच्या घराण्यातील सदस्य- प्रत्यक्ष शेती करत राजकारणात सक्रिय. त्यातून सामान्य जनतेशी नाळ.- तालुका खरेदी-विक्री संघ, ग्रा.पं., पं.स. निवडणुका लढविल्याने राजकीय अनुभव गाठीशी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Nandedनांदेडkinwat-acकिनवट