शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Election 2019 : बंड झाले थंड ! चिखलीकरांपाठोपाठ खतगावकरही नरमले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 18:01 IST

दोघांकडून मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका

ठळक मुद्देजिल्ह्यात भाजपाला दोनच जागाचिंतनासाठी मागितला वेळ

नांदेड : लोहा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यानंतर समर्थकांनी बंडाचा झेंडा फडकावल्यानंतर खा.चिखलीकरांनी मुख्यमंत्री सांगतील तोच निर्णय घेतला जाईल असे सांगत नरमाईची भूमिका घेतली होती़ चिखलीकरांपाठोपाठ आता भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर यांनीही चिंतनासाठी वेळ मागत बंडाचा झेंडा खाली ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे़

सेना-भाजपाच्या युतीमध्ये विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर यांचे पूत्र प्रवीण पाटील चिखलीकर हे भाजपामधून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते़ मात्र लोह्याची जागा सेनेला सुटली़ तर नायगाव विधानसभा मतदारसंघातून प्रदेश उपाध्यक्ष खतगावकर यांची सून डॉ़मिनल पाटील खतगावकर यांनी विधानसभेसाठी तयारी केली होती़ नायगावची जागाही मित्रपक्ष रिपाइंला सोडून तेथे राजेश पवार यांना उमेदवारी देण्यात आली़ या प्रकारामुळे विद्यमान खा़प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खाख़तगावकर यांच्या समर्थकांनी लोहा आणि नायगाव मतदारसंघात वेगळी भूमिका घेण्याची मागणी केली होती़ मंगळवारी झालेल्या बैठकीत चिखलीकरांनी समर्थकांपुढे गुरुवारपर्यंतची वेळ मागितली होती़ तर खतगावकरांच्या राजेंद्रनगर येथील निवासस्थानी गुरुवारी झालेल्या बैठकीत खतगावकरांनी समर्थकांपुढे शुक्रवारी सकाळपर्यंतची वेळ चिंतनासाठी मागितली आहे़ 

राजेंद्रनगर येथे झालेल्या बैठकीत गुरुवारी खतगावकर समर्थकांनी डॉ़मिनलताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी आग्रह धरला़ तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य राहील असेही कार्यकर्त्यांनी भावनाविवश होत सांगितले़ यावेळी व्यंकट पाटील गुजरीकर, शेख वल्ली, मंगल देसाई, खालयाअप्पा कासराळीकर, जीवन चव्हाण, भगवानराव मनूरकर, धनराज शिरोळे, सुभाष खांडरे, धोंडीबा कांबळे, सरजीतसिंघ गील, नामदेव पाटील जाहूरकर, यादवराव तुडमे आदी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़ या सहविचार सभेत बोलताना डॉ़मिनलताई खतगावकर यांनी पक्षाकडे खतगावकरांनी आपल्या तिकीटाची मागणीही सून म्हणून नव्हे तर हे काम करणारी कार्यकर्ती म्हणून मागितले होते़ पक्षाने कामाची दखल घेतली नसली तरीही आपण पक्षकार्य सुरूच ठेवू असे त्यांनी स्पष्ट केले़ त्यानंतर खतगावकर यांनी कार्यकर्त्यांपुढे जिल्ह्यात आपण भाजपाला ताकद दिल्याचे सांगताना आम्ही काही संन्यासी नाहीत, आम्हालाही कार्यकर्त्याची चिंता आहे़ पण त्याच वेळी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात चांगले काम होत असल्याचे सांगत त्यांनी कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घेवू असे सांगून शुक्रवारी सकाळपर्यंत चिंतनासाठी वेळ मागितली़ 

या बैठकीनंतर माजी खाख़तगावकर यांनी पत्रकारांशी बोलताना प्रत्येक पक्षात उमेदवारीसाठी स्पर्धा असते, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असंतोष असतो असे सांगितले़ भाजपा हा कुटुंबियांना तिकीट देत नसल्याचे सांगितले़ 

जिल्ह्यात भाजपाला दोनच जागालोकसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त करणाऱ्या भाजपाला जिल्ह्यात केवळ दोनच जागा मिळाल्या आहेत़ यामुळे कार्यकर्ते नाराज आहेत़ किमान पाच जागा तरी मिळाव्यात अशी अपेक्षा होती़ पण ती पूर्ण झाली नाही़ याबाबत निश्चितच विचार करण्याची गरज असल्याचेही खतगावकर म्हणाले़ काँग्रेससोबत काही चर्चा झाली काय, या प्रश्नावर त्यांनी सर्व गोष्टी सांगायच्या नसतात, असे उत्तर दिले़ 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019NandedनांदेडPratap Patil Chikhalikarप्रताप पाटील चिखलीकरBJPभाजपा