शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

Maharashtra election 2019 :लोह्याच्या चौरंगी लढतीने वेधले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 20:33 IST

मतविभाजनामुळे धक्कादायक निकालाची शक्यता

ठळक मुद्देशेकापच्या बालेकिल्ल्याला सुरुंगचारही तुल्यबळ उमेदवार

-  प्रदीप कांबळे

लोहा या मतदारसंघालाजवळपास ३५ वर्षे माजी खा़ व आ. भाई केशव धोंडगे यांनी शेकापचा बालेकिल्ला अशी ओळख निर्माण करून दिली होती़ मात्र १९९५ नंतर बालेकिल्ल्याला शिवसेनेने सुरुंग लावला़ मागील निवडणुकीपासून मुक्तेश्वर धोंडगे भाजप व आता सेनेच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. तर त्यांचे परंपरागत राजकीय प्रतिस्पर्धी माजी आ. शंकरअण्णा धोंडगे यांचे  पुत्र दिलीप धोंडगे पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. खा. चिखलीकर यांचे मेहुणे श्यामसुंदर शिंदे खटाऱ्यात बसून विधानसभा गाठण्यासाठी प्रयत्नरत आहेत. मात्र, वंचित बहुजन आघाडीचे शिवकुमार नरंगले हे बहुजन व जातीय समीकरणाच्या मुद्यावर निर्णायक ठरण्याची शक्यता आहे़

शिवसेनेकडून मुक्तेश्वर धोंडगे निवडणूक रिंगणात आहेत़ मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी बदलले आहेत. खा. चिखलीकरांचे मेहुणे सेवानिवृत्त सनदी अधिकारी श्यामसुंदर शिंदे हे पहिल्यांदाच विधानसभेच्या निवडणूक आखाड्यात उतरले आहेत. मात्र त्यांनी मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक लढवली होती. त्यांचा काँग्रेसच्या अमरनाथ राजूरकर यांनी पराभव केला होता. यावेळी त्यांनी ‘अभी नाही तो कभी नही’ चा नारा देत दंड थोपटले आहेत. प्रारंभी तिकीट वाटपावरुन शिंदे अन् चिखलीकर कुटुंबात चांगले रण पेटले होते़ तीन दिवसांपूर्वी (शिंदे) मामाच्या मदतीला भाचे प्रवीण चिखलीकर धावून आले. तर माजी आ. रोहिदास चव्हाण जावयाच्या भावाच्या मदतीसाठी काँग्रेस पक्ष सोडून सेनेत पुनश्च डेरेदाखल झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप धोंडगे हे शिवसेनेचे उमेदवार मुक्तेश्वर धोंडगे यांचे भाचजावई आहेत. वंचित बहुजन आघाडीने रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा तरुण उमेदवार शिवकुमार नरंगले यांना उमेदवारी दिली. प्रमुख चार प्रबळ उमेदवारांपैकी तीन मराठा तर वंचितकडून लिंगायत उमेदवार आहे़

मतदारसंघातील प्रमुख प्रश्न- पाण्याची सातत्याने होणाऱ्या टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी योजना अंमलात आणणे, माजलगाव कालवा काम, लेंडी, वाडी-तांडे तसेच लोहा शहराला लिंबोटी धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा करण्याची गरज आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून याकडे दुर्लक्ष करण्यात आले़ग्रामीण भागातील रस्त्यांची चाळणी झाली असून दळणवळणास अडचण, ग्रामीण भागातील रस्त्यावरील पुलांच्या उंची वाढविणे, शहरातील अंतर्गत तसेच मुख्य रस्त्याचा प्रश्न कायम आहे़- औद्योगिक क्षेत्र वाढवून बेरोजगारांच्या हातांना काम उपलब्ध करुन देण्याची गरज आहे़ लोहा अन् कंधार या दोन्ही तालुक्यांतून दरवर्षी कामाच्या शोधात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होते़ हे स्थलांतरण रोखावे लागणार आहे़  जि. प. च्या शाळांची दयनीय अवस्था आहे़ मतदारसंघातील शिक्षणाच्या दर्जाबाबतही वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येतात़ 

प्रमुख पक्षांच्या उमेदवाराची जमेची बाजूमुक्तेश्वर धोंडगे (शिवसेना)मुक्तेश्वर धोंडगे हे माजी आ. व खा.केशवराव धोंडगे यांचे पुत्र आहेत़ त्यांनी बाजार समिती संचालक म्हणून काम केले़ अनेक शैक्षणिक संस्था, दोनवेळा जि.प. निवडणुकीचा व एक विधानसभा निवडणुकीचा अनुभव, पत्नी जि.प.सदस्या, राजकारण व समाजकारणात त्यांचा सक्रिय सहभाग आहे़

श्यामसुंदर शिंदे (शेकाप)श्यामसुंदर शिंदे हे चिखलीकर यांचे मेहुणे आहेत. सेवानिवृत्त सनदी अधिकारी असल्याने त्यांना प्रशासकीय कामकाजाचा अनुभव ही जमेची बाजू आहे. मतदारसंघात त्यांच्या पत्नीचे सामाजिक क्षेत्रात कार्य, समाजाशी सलोख्याचे संबंध, चिखलीकर यांच्यासोबत घेतले जुळवूऩ

दिलीप धोंडगे (राष्ट्रवादी)दिलीप धोंडगे यांनी जि.प.उपाध्यक्ष पदी यशस्वी काम केले. तरुणांमध्ये लोकप्रिय, सामाजिक, धार्मिक, राजकीय कार्य. वडील माजी आ.शंकर अण्णा धोंडगे यांच्या शेतकरी चळवळीतील योगदान मोठे आहे़ गेल्या अनेक वर्षांपासून तयारी सुरु आहे़

शिवा नरंगले (वंचित आघाडी)शिवकुमार नरंगले ग्रामपंचायतचा कारभार, विविध पक्षांत व नेतेमंडळीसोबत सुसंबंध, सामाजिक, राजकीय कार्यात अग्रेसर, चळवळीत व आंदोलनप्रसंगी कार्यकर्त्यांसाठी धावून जाणारा नेता म्हणून त्यांची ओळख़ मतदारसंघात लिंगायत समाजाचे मोठे प्राबल्य आहे़

2०14चे चित्रप्रताप चिखलीकर (शिवसेना)  मुक्तेश्वर धोंडगे (भाजपा-पराभूत) 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019loha-acलोहाNandedनांदेड