शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाच्या मजुरीवरून झाली कुरबूर;संतापात मध्यप्रदेशच्या मजुरांनी मालक पितापुत्रास संपवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2022 18:43 IST

पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत या दुहेरी खुनाचा उलगडा केला आहे

बिलोली ( नांदेड ) : मजुरीच्या पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मध्यप्रदेशच्या मजुरांनी हरभरा काढणी यंञाचा मालक व त्याच्या मुलाचा खून केल्याची घटना मंगळवारी ( दि.१) उघडकीस आली आहे. पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत या दुहेरी खूनाचा उलगडा केला असून मजूर आरोपींनी पित्याचा मृतदेह दफन केले तर पुञाचा मृतदेह उमरखेड घाटात फेकले असल्याची कबुली दिली आहे. खुनाची ही घटना २० फेब्रुवारी रोजी मध्यराञी बिलोली तालुक्यातील हुनगुंदा गावात घडली.

हरभरा, उडीद, मुग,सोयाबीन  यासारखे खरीप पिके काढणीस आले आहेत. व्यापाराची संधी साधत राजस्थान येथिल पिता-पुत्र हरभरा काढणी यंञ घेऊन कामाच्या शोधात बिलोली तालुक्यातील हुनगुंदा येथे दाखल झाले.  या यंञावर मध्यप्रदेशातील ५ मजुरांनी कामास सुरुवात केली. मात्र, २ महिने काम केल्यानंतर पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन मालक व मजुरात कुरबुर सुरु झाली. मालक मजुरी बुडवित असल्याची शंका आल्याने पाचही २० फेब्रुवारीस मजुरांनी पिता-पुञांचा खून केला. 

अशी लावली मृतदेहांची विल्हेवाटदोघांच्या खुनानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मजुरांनी मालकाचा मृतदेह कुंडलवाडी शहरापासुन थोड्याच अंतरावर सुरु असलेल्या रस्त्याच्या शेजारील खड्ड्यात दफन केले. तर पुत्राचा मृतदेह उमरखेड घाटात फेकून देत आपले गाव गाठले. 

पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठले दरम्यान, मृताच्या कुटुंबीयांनी कुंडलवाडी पोलीस ठाणे गाठुन २५ फेब्रुवारी रोजी हरवल्याची फिर्याद दिली. त्यावरुन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांनी तपास सुरु केला. पोलिसांनी थेट मध्यप्रदेश गाठत मजुरांची माहिती घेणे सुरु केले. दोन मजुरांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली. तसेच मालक आणि पुत्राचा मृतदेहाची कशी विल्हेवाट लावली याचा घटनाक्रम सांगितला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेडDeathमृत्यू