उन्हाळी ज्वारीसह भईमुगाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:37+5:302021-04-12T04:16:37+5:30

नांदेड- शहरासह ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट होवून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हळद, उन्हाळी ज्वारीसह भईमुग ...

Loss of groundnut with summer sorghum | उन्हाळी ज्वारीसह भईमुगाचे नुकसान

उन्हाळी ज्वारीसह भईमुगाचे नुकसान

नांदेड- शहरासह ग्रामीण भागात शनिवारी सायंकाळी अचानक विजांचा कडकडाट होवून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने गहू, हळद, उन्हाळी ज्वारीसह भईमुग पिकांचे नुकसान केले. सध्या हळद काढणी चालू आहे. याबरोबरच गव्हाची कापणी करुन राशी करण्याचे काम करण्यात येत आहे. मात्र अचानक आलेल्या या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली.

स्वारातीम विद्यापीठाला आज सुटी

नांदेड- ३ एप्रिल रोजी सुटी असतानाही नॅक समिती आल्याने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी कर्तव्यावर होते. ३ रोजी रद्द करण्यात आलेली सुटी आता १२ एप्रिल रोजी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यापीठ परिसर, उपपरिसर लातूर, परभणी, डिग्री कॉलेज हिंगोली येथील सर्व कर्मचाऱ्यांना ही सुटी लागू असणार आहे.

आवास योजनेचा ८३ कोटी निधी थकीत

नांदेड- पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत मनपा क्षेत्रात ७ हजार ३३१ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. केंद्र सरकारचा वाटा असलेल्या १ ते १२ डीपीआरमधील ८३ कोटी ५२ लाखांचा निधी वर्षभरापासून थकला आहे. घरकुलाच्या लाभार्थ्यांना निधी मिळालेला नसल्याने ते मनपा प्रशासनाकडे चकरा मारत आहेत.

२४०० बेडची मनपाकडून व्यवस्था

नांदेड- मनपा आरोग्य विभागाच्यावतीने नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात येत आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने रुग्णांना उपचार मिळावेत यासाठी मनपा प्रशासनातर्फे पंजाब भवन येथे ५००, एनआरआय निवास ५००, महसूल भवन कौठा ४००, फातेमा उर्दू हायस्कूल १ हजार अशा एकूण २४०० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे.

४५ पेक्षा कमी वयोगटाला तूर्त लस नाही

नांदेड- कोविड लसीकरण मोहिमे अंतर्गत मनपातर्फे लस देण्यात येत असली तरीही सध्या ४५ पेक्षा कमी वय असलेल्या कोणालाही लस देण्यात येणार नाही. याबरोबरच फ्रंटलाईन वर्कर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना तूर्त लसीचा डोस देणे बंद करण्यात आले आहे. ४५ वर्षापेक्षा अधिकच्या नागरिकांनी लसीकरण करण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

१०५ ब्रास रेती साठा जप्त

नांदेड- लोहा तालुक्यातील पेनूर येथील गोदावरी नदीत अवैध रेती उपसा करण्यात येत होता. उपविभागीय अधिकारी पांडुरंग बोरगावकर यांनी तेथे छापा टाकून १०५ ब्रास रेती जप्त करुन सुमारे ५ लाखांचा महसूल शासन तिजोरीत जमा केला. तलाठी मारोती कदम, मंडळाधिकारी कठारे, निकम जाधव आदींनी ही कारवाई केली.

Web Title: Loss of groundnut with summer sorghum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.